Admission for Architecture
Admission for Architecture sakal
एज्युकेशन जॉब्स

Architecture Admission : आर्किटेक्चरची प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेली

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जुलैचा शेवटचा आठवडा उजाडला तरीही पाच वर्षाच्या आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. वास्तुकला परिषदेच्या नॅशनल अप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) या परीक्षेचा निकाल घोषित होऊन तीन दिवस लोटले, तरीही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) यंदाचे प्रवेश वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

सीईटी सेलने प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची संभाव्य तारीख १८ जुलै जाहीर केली होती. पण तीन दिवसांनंतरही ही प्रक्रिया सुरू करता आलेली नाही. त्यामुळे इच्छूक विद्यार्थी व त्यांचे पालक हतबल झाले आहेत.

राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. त्यामुळे लवकरच पदवीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण अजूनही विद्यार्थी प्रतिक्षेत आहे.

सीईटी सेलकडून अधिकृत संकेतस्थळावर १८ जुलै ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची संभाव्य तारीख असल्याचे जाहीर केले. मात्र, तीन दिवस उलटूनही सीईटी सेलला ही प्रक्रिया सुरू करता आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT