Balrakshak app
Balrakshak app esakal
एज्युकेशन जॉब्स

शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी ‘बालरक्षक ॲप’

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे पालकांचे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या (RTE) प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे दर वर्षी सर्वेक्षण मोहीम राबविली जाते; परंतु तरीही शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा आकडा कमी होत नसल्याने आगामी शैक्षणिक वर्षांपासून मोबाईल ॲप्लिकेशनच्या (Mobile app) माध्यमातून सर्वेक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे राज्यपातळीवर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होऊन त्यावरील उपाययोजना करणे शक्य होईल, असा विश्‍वास शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वस्तुनिष्ठ आकडेवारीसाठी ॲपची निर्मीती

राज्यातील शिक्षक मान्यता प्रक्रिया, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात लाखो विद्यार्थी शाळाबाह्य असले तरी सरकारच्या सर्वेक्षण पद्धतीत अनेक त्रुटी असल्याने वस्तुनिष्ठ आकडेवारी जाहीर होत नसल्याच्या तक्रारी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक मान्यतांच्या प्रक्रियेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात येत आहे.

राज्यात शिक्षक मान्यतांची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांत शिक्षक मान्यतांच्या प्रक्रियेत गैरप्रकार आणि अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. काही अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईही सुरू आहे. दोन वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पवित्र संकेतस्थळाची निर्मिती करून त्याद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक मान्यतांच्या प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी आता ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत आहे.


चार प्रकारांमध्ये होणार माहिती संकलित

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्याची प्रक्रियाही आता मोबाईल अ‍ॅप्लिकेशनशी जोडण्यात येणार आहे. तीन ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचा शोध टाटा ट्रस्टच्या (TATA Trust) बालरक्षक अ‍ॅपद्वारे घेतला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबातील मुलांची चार प्रकारांमध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीशी बालरक्षक अ‍ॅप जोडण्यात येणार असल्याने सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती आणि बालरक्षक अ‍ॅपची माहिती तपासता येईल. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे अधिक सोपे होईल. त्यासाठी राज्यात काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणही करण्यात आले आहे.

''शिक्षक मान्यतांसाठीच्या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिक्षक मान्यतांच्या प्रक्रियेत गैरप्रकार होतात. मात्र, संकेतस्थळांद्वारे मान्यतांची प्रक्रिया राबविताना ती ‘रिअल टाइम’ असेल. त्यात मागच्या तारखेने मान्यता देणे वगैरे प्रकार शक्य होणार नाहीत. त्यामुळे शिक्षक मान्यतेच्या प्रक्रियेतील गैरप्रकार रोखले जातील.'' - विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन

एमआयडीसी मध्ये जागा बघितली होती पण... दाभोलकर खुनाप्रकरणी जन्मठेप झालेल्या शरदच्या घरी शोकाकुल वातावरण

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरसह कागल परिसरात जोरदार पाऊस सुरु

OTT Release This Weekend: 'अनदेखी 3', मर्डर इन माहिम अन् आवेशम; वीकेंडला घरबसल्या पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

Life on Earth is in Danger: आता शेवटच्या टप्प्यात! पृथ्वीवरुन मानव कधी होणार नष्ट? खळबळजनक माहिती समोर

SCROLL FOR NEXT