bhmct in hotel management
bhmct in hotel management sakal
एज्युकेशन जॉब्स

‘हॉटेल मॅनेजमेंट’मध्ये ‘बी-एचएमसीटी’

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

मनुष्य जीवनात कितीही उच्चतर ध्येय ठेवत असला, तरी पोटापाण्याला विसरू शकत नाही. घरातील पदार्थांबरोबरच खवय्याला बाहेर हॉटेलमध्ये खाणंही आवडतं. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बरकतीचा मानला जातो. हॉटेलसोबतच हॉस्पिटॅलिटी, प्रवास, इव्हेंट्स, आदरातिथ्याच्या पद्धती, कॉर्पोरेट कल्चर हे आता परवलीचे शब्द झाले आहेत. या सर्वांशी संबंधित असलेल्या या कार्यक्षेत्रासाठी प्रशिक्षित करणारी पदवी आहे बीएचएमसीटी (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी).

कालावधी

या पदवीचा कालावधी बारावीनंतर चार वर्षांचा आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा किमान ४५ टक्क्यांनी (राखीव गटासाठी ४०%) उत्तीर्ण झालेली असावी. MAH-HM-CET ही प्रवेशपरीक्षा घेतली जाते. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असतो. परीक्षा बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाची असून, माध्यम इंग्रजी असते. एकूण १०० प्रश्न आणि १०० गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. इंग्लिश, रिझनिंग, चालू घडामोडी, संस्कृती, खेळ, व्यापार, पर्यटन, शास्त्रीय शोध आदी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात. (प्रवेशाचे आणि पात्रतेचे नियम संस्थापरत्वे बदलू शकतात.)

विषय

फूड प्रॉडक्शन, कीचन ऑपरेशन मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग ऑपरेशन्स, फूड अँड बीवरेज सर्व्हिस, इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी, मार्केटिंग मॅनेजमेंट, कुलिनरी प्रॅक्टिस, हॉटेल इकॉनॉमिक्स, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, ॲडव्हान्सड फूड प्रॉडक्शन, हॉटेल इन्फॉर्मेशन सीस्टिम, बँक्वेट मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, इव्हेंट प्लॅनिंग आदी विषय असतात.

स्वरूप

विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण सत्रे, इंटर्नशिप आणि उद्योग भेटीद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळतो. हे व्यावहारिक अनुभव विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेले थिअरी स्वरूपातील ज्ञान वास्तविक परिस्थितींमध्ये वापरण्यास उपयुक्त ठरतात. यामुळे त्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आवश्यक कौशल्ये आणि क्षमता विकसित करता येतात. हॉटेल आणि खानपान उद्योगाच्या विविध पैलूंमध्ये कौशल्य, ज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. फूड प्रॉडक्शन, कूकिंग, केटरिंग, फ्रंट डेस्क ऑपरेशन्स, हाऊस कीपिंग, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, फायनान्स अशा प्रकारच्या कामांचे इत्थंभूत ज्ञान दिले जाते. प्रात्यक्षिक अध्यापनावर अधिक भर दिला जातो.

पदे

स्टीवर्ड, फ्रंट ऑफिस मॅनेजर, सेल्स मॅनेजर, हॉटेल मॅनेजमेंट ट्रेनी, बारटेंडर, कस्टमर रिलेशन मॅनेजर, चीफ शेफ, युनिट मॅनेजर, फूड मॅनेजर, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर, रेस्टॉरँट मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर आदी पदांवर काम करता येते. सुरुवातीचा अनुभव एखाद्या जबाबदारीसाठीचा मिळाला किंवा एखादे कार्यक्षेत्र पक्के झाले की, पुढील अनुभव आणि त्या पुढील करिअर हे त्याच भूमिकेसाठी प्रामुख्याने होऊ शकते. काही पदे अनुभवातून मिळत जातात, काही पदे अभ्यासक्रमातील स्पेशलायजेशनवर अवलंबून असतात.

स्कोप

सध्या आर्थिक विकसनाचा स्तर सातत्याने वाढतो आहे. पैशांची उपलब्धतता, बदलते जीवनमान, खानपानाच्या सवयी, सामाजिक प्रतिष्ठा, उपभोगवृत्ती, आनंदी जीवनाचे निकष, तर कधी या सगळ्यांचा परिपाक म्हणून हॉटेलिंग करणे हे अनेकांसाठी नित्याचे झाले आहे. त्यामुळे नवनवीन पदार्थ, रेसिपींची रेलचेल, कमालीची स्वच्छता, झगमगाट यांमुळे हॉटेल व्यवसाय हा मोठा उद्योग म्हणून अर्थकारणाचा भाग झाला आहे.

प्रशिक्षित कर्मचारी, अद्ययावत सुविधा, सर्वोत्तम दर्जाचे व्यवस्थापन ही निकड झाली आहे. शास्त्रीय आणि तांत्रिक ज्ञान असणारे, संबंधित क्षेत्रातील पदवीधर, कुशल मनुष्यबळ या क्षेत्राला सातत्याने हवे आहे. भारतातील मेट्रो शहरांची वाढ, सुशिक्षित मध्यमवर्गाची प्रगती यांमुळे आगामी काळात सुसंबद्ध पद्धतीने सेवा देणारे हे क्षेत्र अधिक व्यापक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT