CET Exam
CET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

CET Exam : बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम परिक्षांना आता सीईटी बंधनकारक...

मिलिंद संगई

बारामती - बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी आता सीईटी परिक्षा बंधनकारक करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

गुरुवार (ता. 21) पासून अर्ज नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. Maha-B.BCA/BBA/BMS/BBM सीईटी 2024 सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 एप्रिल 2024 पर्यंत देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून बीसीए, बीबीए,बीएमएस, बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना सीईटी लागू करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्षे 2024-2025 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे.

उमेदवार,पालक,संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी 2024 या सामाईक प्रवेश परीक्षेचा दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवार व पालकांच्या माहितीसाठी संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असणार आहे.

अर्ज कसा करावा

सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्यावी, होम पेजवर दिलेला बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम CET टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना नोंदणी पुर्ण करावी लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT