teachers
teachers sakal
एज्युकेशन जॉब्स

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मागील दोन वर्षांपासून जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झालेल्या नाहीत.

पुणे - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मागील दोन वर्षांपासून जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा तरी शिक्षकांच्या बदल्या केल्या जाव्यात आणि यासाठीची प्रकिया त्वरित सुरु करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे. ही प्रक्रिया त्वरित सुरू न झाल्यास येत्या सोमवारपासून (ता.२३) शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गामुळे सन २०१९ ते २०२१ दोन वर्षात एकाही शिक्षकांची बदली झालेली नाही. शिवाय यंदाही बदल्यांबाबतची संगणक प्रणाली विकसित न झाल्याने अद्याप शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली नाही. आता शाळा सुरू झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबविण्याचा सरकारचा मानस असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदाही शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया रखडणार असल्याचे चित्र दिसू लागले असल्याचा आरोप या शिक्षक महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे.

कांबळे म्हणाले, ‘शिक्षकांची बदली प्रक्रिया १ मे २०२२ पासून सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आता १९ मे उजाडला आहे. तरीही शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर झालेली नाही. याशिवाय दुर्गम क्षेत्र निश्चित करणे, रिक्त जागा जाहीर करणे या बाबी अद्याप शिल्लक आहेत. बदली हा सर्व शिक्षकांचा भावनिक आणि संवेदनशील विषय आहे. राज्यातील लाखो शिक्षक बदली प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षे प्रलंबित असलेली ही बदली प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू करावी, अशी शिक्षक महासंघाची मागणी आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT