Digital Citizenship
Digital Citizenship Sakal
एज्युकेशन जॉब्स

‘स्किल’फूल : आभासी जगताची डिजिटल सिटिझनशिप

डॉ. दीपक ताटपुजे

व्हर्च्युअल (आभासी) जगतामध्ये, डिजिटल स्किल्सचा मूलभूत विचार हा डिजिटल सिटिझनशिप (नागरिकता) मध्ये विविध प्रकारे करण्यात आला आहे.

व्हर्च्युअल (आभासी) जगतामध्ये, डिजिटल स्किल्सचा मूलभूत विचार हा डिजिटल सिटिझनशिप (नागरिकता) मध्ये विविध प्रकारे करण्यात आला आहे. डिजिटल नागरिकत्वामध्ये डिजिटल वातावरणात सकारात्मक, समीक्षक आणि सक्षमपणे अस्तित्व दाखवण्याची क्षमता, प्रभावी संवाद आणि नवनिर्मिती कौशल्यांची निर्मिती, तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराद्वारे मानवी हक्क आणि प्रतिष्ठेचा आदर करणाऱ्या सामाजिक सहभागाच्या प्रकारांचे समर्थन करणे आदी विविध कौशल्यांचा समावेश होतो.

आभासी जगतात ऑनलाइन संभाषण करताना इतरांना त्रास देणे किंवा द्वेषपूर्ण टीका टाळणे. स्वतःला आणि इतरांना बेकायदा कन्टेन्ट डाउनलोड करू नये यासाठी प्रोत्साहित करणे व डिजिटल मालमत्तेचा आदर करण्याचे सॉफ्ट स्किल आत्मसात करणेही महत्त्वाचे आहे.

डिजिटल कॉमर्सच्या आभासी (व्हर्चुअल) जगतात पैसे वापरण्याशी संबंधित सुरक्षिततेच्या समस्यांना सायबर सेफ्टी स्किल्सद्वारे सामोरे जाण्याची आवश्यकता गरजेची आहे. युवकांना ते भविष्‍यात निवडू शकतील अशा विविध करिअर पर्यायांबद्दल शिकवण्‍यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यासाठी ई-कॉमर्स कसे कार्य करते हे समजून घेणारे कौशल्य आवश्यक आहे.

डिजिटल कम्युनिकेशन (ऑनलाइन संवाद) इतके सामान्य झाले आहे की, अनेक वेळा आपण हे विसरतो की ते आभासी जगतात करत आहेत, जिथे अनेकदा गैरसंवाद घडतो त्यामुळेच प्रत्येकाच्या वापरकर्त्यांकडून सहानुभूती आणि योग्य प्रतिक्रिया आवश्यक असणारे कौशल्य विकसित करणे ही आभासी जगताची प्रमुख गरज बनली आहे.

डिजिटल साक्षरता कौशल्यामध्ये वास्तविक आणि बनावट सामग्रीमध्ये फरक करण्याची क्षमता ही देखील समाविष्ट आहे ज्याचा जीवनातील अनेक आभासी कार्यांमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सक्षम डिजिटल ओळख

डिजिटल शिष्टाचार कौशल्य हे करिअरसाठी ‘सक्षम डिजिटल ओळख निर्मिती’ होण्यासाठी शिकले पाहिजे. ऑनलाइन सामग्रीला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी डिजिटल शिष्टाचार हे त्यांच्या ऑनलाइन वर्तनाला आकार देतात व त्यामुळेच त्यांची ऑनलाइन वृत्ती वास्तविक जगात प्रतिबिंबित होते आहे. डिजिटल कायदा ज्ञान आणि तदनुषंगिक तंत्रज्ञान कौशल्य ऑनलाइन वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या परस्परसंवादासाठी आवश्यक आहे. डिजिटल कायदा कायदेशीर अधिकार आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवणाऱ्या निर्बंधांशी संबंधित आहे. कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन गुन्हे रोखण्यासाठी, कितीही गंभीर असले तरी, डिजिटल नागरिक म्हणून आपल्याला कायदा आणि विशेषतः तो त्यांना कसा लागू होतो हेही जाणून घेणे तेवढेच आवश्यक आहे.

डिजिटल अधिकार आणि जबाबदारी हे ऑनलाइन जगाचे नियम व तंत्रज्ञान कौशल्य या प्रक्रियांचे द्योतक आहेत आणि वापरकर्त्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या ही आहेत. इंटरनेट हानिकारक हेतूंसाठी देखील वापरला जाऊ शकतो आणि त्यामुळेच एथिकल हॅकिंग या कौशल्याचे महत्त्व वाढत आहे. डिजिटल आरोग्य आणि निरोगीपणा कौशल्याने स्वत:ला तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरापासून व संभाव्य हानीपासून वाचवायला शिकले पाहिजे आणि प्रत्येकाने धोक्यांबद्दल देखील जागरूक असले पाहिजे.

डिजिटल सुरक्षा ऑनलाइन जगात महत्त्वाची आहे त्यासाठी संभाव्य मालवेअर हल्ल्यांबद्दलही जागरूक असले पाहिजे. उपकरणांचे शक्य तितके संरक्षण कसे करावे हे कौशल्य आत्मसात करावे लागेल.

आपण डिजिटल युगात राहत असलो तरी समाजातील प्रत्येकाला हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. या डिजिटल विभाजनाची (डिजिटल डिव्हाईस) जाणीव ठेवली पाहिजे. सर्वांना संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर परवडत नाही म्हणूनच प्रत्येकाच्या डिजिटल कौशल्ये गरजांसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून देणे ही एक सामाजिक गरज बनली आहे.

ज्ञान निर्मित आणि कौशल्याधारित रोजगार क्षमता विकासामध्ये करिअर पर्यायांसाठी डिजिटल सिटीझनशिप मध्ये विचार केलेल्या अनेक मूलभूत डिजिटल कौशल्यांचा उपयोग होत असल्यानेच या कौशल्यांकडे गांभीर्याने बघून आत्मसात करावे. आभासी जगताची सजग, सक्षम, सुशिक्षित, जागरूक आणि जबाबदार नागरिकता विकसित होण्यासाठी डिजिटल सिटीझनशिप आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT