केवळ विज्ञान आणि वाणिज्य शाखेतूनच आपण आपले भवितव्य उज्ज्वल करू शकता असे नक्कीच नाही.
केवळ विज्ञान आणि वाणिज्य शाखेतूनच आपण आपले भवितव्य उज्ज्वल करू शकता असे नक्कीच नाही. कला शाखेकडे प्रवेश म्हणजे आता आपल्यासमोर अर्थार्जनाचे अनेक पर्याय उघडल्या सारखेच आहेत. भाषा विषयाचे अध्ययन करून आपल्याला भविष्यातील समृद्ध जीवनासाठी सक्षम बनवता येईल. सभोवतालच्या समाजाचे निरीक्षण केल्यास प्रत्येक ठिकाणी भाषेचा वापर कसा होतो आणि त्याच्या साहाय्याने आपण किती यशस्वी होऊ शकतो हे सहज अनुभवायला येईल. केवळ इंजिनिअर, डॉक्टर आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आदी भरपूर कमाई करू शकतात असे नाही, तर भाषा विषयातील प्रवीण लोकही भरपूर आर्थिक कमाई साधू शकतात. ते उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात.
भाषेवर प्रभुत्व मिळवलेली व्यक्ती किती उंची गाठू शकते हे तुमच्या आजूबाजूला कधी पाहिलं आहे का? यशासाठी आकाश ही फक्त सीमाच असेल अशी उंची गाठता येऊ शकते. भाषा विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी येथे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक
अगदी तत्काळ आरामदायी क्षेत्र हे शिकविण्याचे क्षेत्र मानले जाते. व्याकरणाच्या अचूकतेसह भाषेवर प्रभुत्व मिळवणे आणि साहित्यातील रस असेल तर या क्षेत्रात प्रवेश करू शकतो. पदवीपर्यंत शिकल्यानंतर तुम्ही शाळेत शिक्षक होऊ शकता, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही उच्च माध्यमिक स्तरावर शिकवू शकता किंवा वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर व्याख्याता होऊ शकता किंवा उच्च स्तरावर तुमच्या कौशल्यासह विद्यापीठ विभागाचे प्राध्यापक किंवा रिडर, या पदावरून विद्यार्थी घडवू शकता. अर्थातच पीजीडीटीई, बीएड, एमएड, नेट, सेट, एमफिल आणि डॉक्टरेट यांसारख्या व्यावसायिक पदवी उच्च स्तरावर जाण्यास मदत करतील. भाषा विषय शिक्षक यांची जगभर आवश्यकता असते. आपण आपल्याला किती सिद्ध करतो यावर आपली प्रगती अवलंबून.
कार्यालये - कोणत्याही कंपनीच्या अगदी मूलभूत कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट हाउसेस, बँकांपर्यंत किंवा त्या बाबतीत कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये अभ्यागतांशी व्यवहार करण्यासाठी एक फ्रंट ऑफिस असते. ग्राहकांशी व्यवहार करताना भाषेचा सुरेख वापर तिथे आवश्यक असतो. भाषेचा ओघ तुम्हाला रिसेप्शनिस्ट, फ्रंट-ऑफिस मॅनेजर, पीआरओ इत्यादी पदे देऊ शकतो. बोलल्या जाणाऱ्या भाषेवर चांगले प्रभुत्व, सॉफ्ट स्किल्सचा वापर आणि देहबोलीचा योग्य वापर यामुळे तुम्हाला संस्थेचा महत्त्वाचा भाग होता येईल. भाषा विषयात पदवी घेतल्यानंतर एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. सारख्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन हे प्राप्त करणे सहज शक्य आहे.
या बाबतीतील अन्य संधींची माहिती पुढील भागात घेऊ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.