Ikigai
Ikigai sakal
एज्युकेशन जॉब्स

‘इकिगाई’चे महत्त्व

डॉ. मिलिंद नाईक

आपले जीवनकार्य ठरवताना चार गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला काय आवडते? दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला काय जमते? तिसरी गोष्ट म्हणजे, जगाला काय हवे आहे? आणि चौथी गोष्ट म्हणजे, कशाद्वारे पैसे मिळू शकतात?

सर्वांत पहिल्यांदा आपल्याला कोणत्या गोष्टी करायला आवडतात अशा गोष्टी शोधायला हव्यात. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की, जे करताना भान हरपून काम होते? वेळ कसा गेला हे कळतसुद्धा नाही? ज्या करताना अगदी जेवण-खाणे, झोपही विसरायला होते? त्या शोधा. एकदा एक गणितवेडा मुलगा संध्याकाळी एक अवघड गणित सोडवायला बसला.

मोठे अवघड गणित होते ते! खूप प्रयत्न करावे लागत होते आणि प्रयत्न करत करत एकदाचे ते सुटले. सुटल्यानंतर तो भानावर आला आणि पाहतो तर काय ! रात्र उलटून सकाळ झाली होती. या विद्यार्थ्याने पुढे गणित ऑलिम्पियाड परीक्षेत भारताचे दोनदा प्रतिनिधित्व करून पदके मिळवून दिली. असे भान हरखून आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो ते शोधा.

आकर्षण की आवड?

आपल्यापैकी खूप जणांना असे वाटते की, चित्रपटात नट व्हावे किंवा उत्तम गायक व्हावे. कधी आमिर खान किंवा कमल हासन व्हावेसे वाटते, तर कधी श्रेया घोषाल किंवा भारतरत्न लता मंगेशकर. खेळणे तर बहुतेक सर्वांनाच आवडते. आपणही क्रिकेटवीर व्हावे असे सर्वांनीच पाहिलेले स्वप्न असते. आकर्षक वाटणे आणि आवडणे यातही फरक आहे. तो फरक करता यायला हवा. आवडणे किंवा इच्छा असणे आणि प्रत्यक्ष करता येणे यात फरक असू शकतो.

उत्तम नाटक करताही यायला हवे किंवा गाता यायला हवे किंवा खेळताही यायला हवे. त्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती लागते किंवा उलटेही असू शकते. तुम्हाला जे जमते, ते आवडेलच असे नाही. चित्रे काढायला जमतात म्हणून चित्रकार व्हावेसे वाटेलच असे नाही. गाडी चालवायला जमते, म्हणजे चालकाचे काम करायला आवडेल असे नाही.

जगाची गरज

तिसरा भाग म्हणजे, तुम्हाला आवडते किंवा जमते म्हणून ते जगाला हवे असेलच असे नाही. तुम्हाला मातीकाम किंवा शिल्पकला उत्तम जमते म्हणून तुम्ही तयार केलेल्या वस्तू जग घेईलच असे नाही. प्लास्टिकच्या जमान्यात मातीची भांडी वापराणे कमी झाले. फायबरच्या जमान्यात सुंदर, टिकाऊ व हलक्या मूर्ती कमी दरात उपलब्ध आहेत.

संगणकाच्या युगात थ्री-डी प्रिंटरची भर पडल्याने जगाची मूर्तीकारांची गरज कमी होत आहे. त्यामुळेच तुमच्याकडे जे आहे, ते जगाला हवे असेलच असे नाही. म्हणूनच जग अधिक चांगले होण्यासाठी जगाला काय हवे आहे? याचा विचार करा. काही गोष्टी अशा असतात की, ज्या तुम्हाला करायला आवडतात, जमतात, जगाला हव्याही असतात, पण लोक त्याचे पैसे द्यायला तयार होत नाही किंवा त्याची योग्य किंमत करत नाहीत.

त्याचे कारण कधी जगाला त्याची किंमत कळलेली नसते किंवा सहज व मुबलक उपलब्धचा असल्यानेही असे होत असेल. काही सेवाकार्ये अशी असतात की, जी जगाला आवश्यक असतात मात्र, त्यातून मोबदल्याची अपेक्षा ठेवू नये असे जगाला वाटते.

योग्य निवड

एका व्हेन आकृतीच्या साहाय्याने तुमच्या संदर्भात या चारही प्रकारच्या गोष्टी लिहा. मधल्या भागात ज्या गोष्टी चारही वर्तुळात आहेत अशा गोष्टी येतील. तेच जीवनकार्य म्हणून निवडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे आवडते त्यातच तुम्ही तरबेज असाल आणि तेच जगाला हवे असल्याने त्याचे पैसे मिळू शकणार असतील तर सर्वांत उत्तम, पण असं होईलच असं नाही.

त्यामुळे चारही बाबींचा विचार करून त्यातल्या त्यात सामायिक गोष्ट करिअर म्हणून निवडावी लागते. ही निवड करता येणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. या निवडीला मदत व्हावी हाच या लेखमालेचा उद्देश आहे. अधिक तपशीलांसाठी ‘इकिगाई’ हे पुस्तक अवश्य वाचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Rava Dosa Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Latest Marathi News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीलचे 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

SCROLL FOR NEXT