Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Lord Jagannath is Modi bhakt: लोकसभा निवडणुका सुरू असताना विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय असंच म्हणावं लागेल.
 Sambit Patra
Sambit Patra

नवी दिल्ली- भाजपचे पुरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संबित पात्रा ( Sambit Patra) यांनी भगवान जगन्नाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुका सुरू असताना विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय असंच म्हणावं लागेल. भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरुन चांगलाच गदरोळ माजला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संबित पात्रा यांच्यासाठी ओडिशाच्या पुरीमध्ये रोड-शो घेतला. यावेळी पात्रा यांनी कनक न्यूज चॅनलशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत. आणि आम्ही सर्व मोदींच्या कुटुंबातील सदस्य आहोत. लोकांकडून अशाप्रकारचा प्रतिसाद पाहून मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मला वाटतं हा आज सर्व ओडिशाच्या लोकांसाठी विशेष दिवस आहे.'

 Sambit Patra
गरीब मुलगा पंतप्रधान झाल्याचं काॅंग्रेसला सहन होईना,संबित पात्रांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

संबित पात्रा यांच्या या वक्तव्यावरुन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईन यांनी समाचार घेतला. भगवान जगन्नाथ यांना मोदींचा भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे. यामुळे भगवान जगन्नाथवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो भक्तांच्या भावनांना दुखावण्यासारखं आहे. भगवान हे सर्वोच्च प्रतिक आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य व्यक्तीशी जोडले जाणे निषेधास पात्र आहे, असं ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत. पटनाईक यांनी 'ओडिया अस्मिता' हा मुद्दा उचलून धरला आहे.

सगळीकडून टीका झाल्यानंतर संबित पात्रा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, 'मी अनेक मीडियांना मोदींच्या रोडशोनंतर बोलला. त्यातील एका मीडियाशी बोलताना मला म्हणायचं होतं की, पंतप्रधान मोदी हे भगवान जगन्नाथ यांचे भक्त आहेत. पण, मी चुकून याच्या विरुद्ध बोलून गेलो. सगळ्यांकडून असं कधीना कधी होतं. त्यामुळे विरोधक याचा मोठा विषय करणार नाहीत अशी अपेक्षा ठेवतो. सगळ्यांकडून कधी बोलण्याच्या ओघात असं होतं.'

 Sambit Patra
Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

संबित पात्रा यांनी जाणूनबुजून बोललं का खरंच त्यांचा गोंधळ झाला हे नक्की सांगता येणार नाही. पण, विरोधकांनी भाजवर हल्लाबोल सुरु केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका करताना म्हटलं की, 'आता पंतप्रधान मोदींना भाजपचे लोक देवाच्या वरती समजायला लागले आहेत. हा उद्धटपणाचा परमोच्च बिंदू आहे. भगवानला मोदींचा भक्त म्हणणे म्हणजे देवाचा अपमान आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com