JEE Mains Exam
JEE Mains Exam sakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Mains Exam : जेईई मेन परीक्षा ४ एप्रिलपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी दुसऱ्या सत्रातील जेईई मेन परीक्षा येत्या गुरुवारपासून (ता. ४) सुरू होत आहे. देश आणि विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

देशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा ‘एनटीए’मार्फत घेण्यात येते. दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमासाठी ४, ५, ६, ८, ९ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. या कालावधीत होणारी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रांत होणार आहे, तर बी.आर्च, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी १२ एप्रिल रोजी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत घेतली जाईल.

या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असणार आहे, हे विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच दिले जाणार आहे, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ‘www.nta.ac.in’ आणि ‘https://jeemain.nta.ac.in/’ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही ‘एनटीए’ने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT