Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

मार्च महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात वाहणारे राजकीय सभांचे, प्रचार फेऱ्यांचे आणि एकूणच राजकारणाचे वारे आज तूर्त थंडावणार आहे.
Loksabha Election
Loksabha Election sakal

नवी दिल्ली : मार्च महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात वाहणारे राजकीय सभांचे, प्रचार फेऱ्यांचे आणि एकूणच राजकारणाचे वारे आज तूर्त थंडावणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यासाठी उद्या (सोमवार) मतदान होणार आहे. या टप्प्यात मुंबई हाच प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला होता.

देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. एकूण सात टप्प्यांमधील सर्वांत कमी मतदारसंघ याच टप्प्यात आहेत.

राज्यात मतदान होणाऱ्या १३ मतदारसंघांमध्ये मुंबई व लगतचे मिळून १० मतदारसंघ आणि नाशिक, दिंडोरी आणि धुळे यांचा समावेश आहे. या ठिकाणी मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. मुंबईत मतदान केंद्रांवर बावीस हजारांहून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड असे दिग्गज रिंगणात आहेत. राज्यातील १३ जागांपैकी ११ जागा सध्या महायुतीकडे आहेत. मात्र, एकूण स्थिती पाहता सर्वच मतदारसंघांमध्ये तोडीस तोड लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवार निवडीवरून सर्वांत जास्त वाद याच टप्प्यातील मतदारसंघांमध्ये झाला होता. त्यामुळे मतविभाजन होणार का, मित्र पक्षांची साथ मिळणार का, या प्रश्‍नांची उत्तरे चार जूनलाच मिळतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे यंदा वायनाडबरोबरच रायबरेली येथूनही रिंगणात असून या मतदारसंघातही सोमवारी मतदान होणार आहे.

याशिवाय, त्यांनी सोडलेल्या अमेठीमध्येही उद्याच मतदान असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी येथे रिंगणात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथसिंह लखनौ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. प्रचारात गाजलेले अयोध्येतील राममंदिर ज्या मतदारसंघात येते, त्या फैजाबाद मतदारसंघातही निवडणूक होत आहे. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेल्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या कैसरगंज मतदारसंघही याच टप्प्यात आहे. तसेच, ओडिशातील ३५ विधानसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.

रिंगणातील प्रमुख नेते

राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान, उमर अब्दुल्ला

येथे मतदान

बिहार (५), झारखंड (३), महाराष्ट्र (१३), ओडिशा (५), उत्तर प्रदेश (१४), पश्‍चिम बंगाल (७), जम्मू-काश्मीर व लडाख

मतदारसंघ व प्रमुख उमेदवार

  • धुळे : सुभाष भामरे (भाजप) - शोभा बच्छाव (काँग्रेस)

  • दिंडोरी : डॉ. भारती पवार (भाजप) - भास्कर भगरे

  • (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

  • नाशिक : हेमंत गोडसे (शिवसेना) - राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) - शांतिगिरी महाराज (अपक्ष)

  • पालघर : भारती कामडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) - हेमंत सावरा (भाजप)

  • भिवंडी : कपिल पाटील (भाजप) - सुरेश म्हात्रे

  • (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

  • ठाणे : राजन विचारे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) - नरेश म्हस्के (शिवसेना)

  • कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना) - वैशाली दरेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • उत्तर मुंबई : पीयूष गोयल (भाजप) - भूषण पाटील (काँग्रेस)

  • वायव्य मुंबई : रवींद्र वायकर (शिवसेना) - अमोल कीर्तिकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • ईशान्य मुंबई : मिहिर कोटेचा (भाजप) - संजय दीना पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • उत्तर-मध्य मुंबई : उज्ज्वल निकम (भाजप) - वर्षा गायकवाड (काँग्रेस)

  • दक्षिण-मध्य मुंबई : राहुल शेवाळे (शिवसेना) -

  • अनिल देसाई (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • दक्षिण मुंबई : यामिनी जाधव (शिवसेना) - अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

राज्ये व केंद्रशासित प्रदेश : ८

मतदारसंघ : ४९

उमेदवार : ६९५

मतदार : ८ कोटी ९५ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com