JNV School Admission  esakal
एज्युकेशन जॉब्स

JNV School Admission : एक रुपयाही खर्च न करता 12वी पर्यंतचे शिक्षण हवंय? मग, 'या' शाळेसाठी भरा अर्ज; अशी आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवोदय विद्यालयात मुलांना वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मिळते. या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊयात.

सकाळ डिजिटल टीम

JNV School Admission :

शालेय शिक्षण घेताना तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाचे नाव ऐकले असेल. नवोदय विद्यालयात पाल्याने शिक्षण घेणे ही खूप अभिमानाची बाब असते. नवोदय विद्यालयात शिकलेली मुलं उच्च पदापर्यंत मजल मारतात. या विद्यालयात आपल्या पाल्याला शिकवण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

विशेष गोष्ट म्हणजे उत्तम प्रतीच्या शिक्षणासोबतच इथे राहणं आणि खाणं सर्व काही मोफत असतं. पाचवीपासून बारावीपर्यंत पाल्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी पालकांना एकही रुपया खर्च करावा लागत नाही. त्यामुळेच मुलाला इथे दाखल करण्यासाठी पाल्यांना धडपडत असतात. (Jawahar Navodaya Vidyalaya Admission Process)

जवाहर नवोदय विद्यालयाचे कामकाज केंद्र सरकारतर्फे चालवले जाते. या विद्यालयात प्रवेशासाठी सर्वात आधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना येथे प्राधान्य दिले जाते. नवोदय विद्यालयात सहावी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

नवोदय विद्यालयात मुलांना वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मिळते. त्यांना सवय लागते. विद्यार्थी शिस्तबद्ध होतात आणि ते हुशारही होतात. त्यामुळे या विद्यालयात जाण्यासाठी मुलंही उत्सुक असतात. या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊयात.

नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मुलांची योग्यता तपासली जाते. या विद्यालयामार्फत प्रत्येक शाळेत एक परीक्षा घेतली जाते. जेएनव्हीएसटी (JNVST) असे परीक्षेचे नाव आहे. ही परीक्षा गणित, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, आणि त्यांचे क्षेत्रीय ज्ञान यावर अवलंबून असते. या परीक्षेत ज्या मुलांना उज्वल यश मिळते त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळतो.

या विद्यालयांमध्ये फी भरून किंवा वशिला लावून ऍडमिशन घेता येत नाही. त्यासाठी तुमचे पाल्य हुशार असावे लागते. नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 75 टक्के जागा मिळतात तर उर्वरित 25 टक्के जागांसाठी शहरी मुलांचा विचार केला जातो.

सामान्यतः पाचवीपर्यंत शिकलेल्या मुलांना जेएनव्हीएसटी  ही परीक्षा देता येऊ शकते. त्यात पास झाल्यानंतर सहावीपासून बारावीपर्यंत सात वर्ष त्या शाळेत शिकता येते. ज्या विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत तिसरी,चौथी आणि पाचवी इयत्तेत शिक्षण घेतले आहे त्यांना सुद्धा या शाळेत ऍडमिशन मिळते.

नवोदय विद्यालयात शिकल्यानंतर मुलांना काय फायदे मिळतात?

  • दर्जेदार शिक्षण मिळेल

  • समान संधी मिळतील

  • आत्याधुनिक सुविधा मिळतील

  • निवासी शाळा सुद्धा मिळेल

  • आणि मोफत शिक्षण मिळेल

कुठल्या सुविधा आहेत फ्री

नवोदय विद्यालयात एकही रुपया खर्च करावा लागत नाही. मुलांचे शिक्षण त्यांचा राहणे, खाणे-पिणे, वह्या, पुस्तक, बॅग्ज या सर्वच गोष्टी मोफत दिल्या जातात. इतकंच नाही तर मुलांना रोज लागणाऱ्या वस्तू जसे टूथब्रश, साबण, तेल, कपडे, इस्त्री, शूज आणि मुलींसाठी सॅनिटरी पॅड सुद्धा मोफत दिले जातात.

नवोदयमध्ये शिकणाऱ्या मुलांचा मेडिकल खर्च, बसची फी, सीबीएससी बोर्डाची फी सुद्धा माफ केली जाते.

कसा करावा अर्ज?

नवोदय विद्यालयात वर्ष 25- 26 साठी प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रवेश फॉर्म भरण्याचे शेवटची मुदत 16 सप्टेंबर आहे. तुम्हाला cbseitms.nic.in या अधिकृत वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध होईल. या फॉर्म सोबत तुम्हाला मुलांचा रहिवासी दाखला सुद्धा जोडणे गरजेचे आहे.

नवोदय विद्यालयातील परीक्षा कशी घेतली जाते

  • परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावरती घेतली जाते

  • परीक्षेचा कालावधी दोन तास असतो

  • परीक्षेचा अभ्यासक्रम हा सीबीएससी पॅटर्नवरती अवलंबून असतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT