Job Searching Dainik Gomantak
एज्युकेशन जॉब्स

Job Searching: पहिला जॉब मिळवण्यात अडचण येत असेल तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Job Searching: तुम्हाला पहिला जॉब शोधण्यात अडचण येत असेल तर पुढील गोष्टी फॉलो करा.

सकाळ डिजिटल टीम

job searching follow these tips to get easily job

अनेक लोक जॉब शोधण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक लोकांचे असते. जर तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केले असेल आणि आता तुम्ही जॉब शोधत असाल, तर तुमचा पहिला जॉब मिळविण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे हे जाणून घेऊया. अनेक वेळा पहिली नोकरी मिळण्यात खूप अडचणी येतात.

  • ऑप्शन शोधावे

सगळीकडे जॉबसाठी अर्ज करून जॉब मिळत नाही. तुम्हाला जॉब हवा असेल तर सर्वातपहिले तुम्हाला जॉबचे पर्याय शोधावे लागतील. जॉबचे अनेक पर्याय आहेत. एकदा तुम्हाला पर्याय माहित झाल्यानंतर, तुमच्यासाठी नोकरी शोधणे सोपे होईल.

  • संयम बाळगा

जर तुम्हाला जॉब मिळाली नाही तर चिंता करू नका, धीर धरावा. अनेक वेळा मित्रांना जॉब मिळतात पण तुम्हाला जॉब मिळत नाही. अशावेळी या गोष्टीचा जास्त विचार करू नका. तुम्ही संयम ठेवून अर्ज करू शकता.

  • सोशल मीडियावर शोधा

तुमचा पहिला जॉब शोधण्यासाठी तुम्ही LinkedIn सारख्या सोशल मीडिया ॲप्सची मदत घेऊ शकता. तसेच आजकाल फेसबुकवर देखील विविध पर्याय उपलब्ध असतात. येथे अनेक कंपन्या फ्रेशर्सना जॉबची संधी देतात. तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

  • कौशल्य

तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे, त्यातील सर्व कौशल्य शिकून घ्यावी. यामुळे तुम्हाला मुलाखतीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे तुम्हाला जॉब मिळण्यास मदत होईल.

  • स्वत:वर विश्वास ठेवावा

तुम्हाला जॉब मिळवण्यास अडचण येत असेल तर लगेच अस्वच्छ होऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

Oats-Paneer Dosa: प्रोटीन आणि फायबरचा पॉवरहाऊस! वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये नक्की अॅड करा ओट्स-पनीर डोसा

SCROLL FOR NEXT