Exam
Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी

सकाळ वृत्तसेवा

डी एड किंवा बीएड किंवा तत्सम अभ्यासक्रमपूर्ण केलेले व तसेच महाटीईटी, सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांचा शिक्षक भरतीकरिता पुढील टप्पा म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी.

- के. रवींद्र

डी एड किंवा बीएड किंवा तत्सम अभ्यासक्रमपूर्ण केलेले व तसेच महाटीईटी, सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांचा शिक्षक भरतीकरिता पुढील टप्पा म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी.

परीक्षेचे स्वरूप - राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांकरिता भरतीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांना निवडीची एकसमान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे. मात्र खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

प्रश्नांचे स्वरूप - शासन निर्णयानुसार अभियोग्यता (Aptitude) आणि बुद्धिमत्ता (Intelligence) चाचणीसाठी मुख्य विषय आहेत. तसेच मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित या विषयांचाही समावेश आहे. परीक्षेचा एकूण २०० प्रश्नांचा कालावधी १२० मिनिटे (२ तास) राहील. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेचे प्रवेश पत्र दि. १५ फेब्रुवारी २०२३च्या नंतर येतील.

भाषा - इंग्रजी १५ प्रश्न (गुण १५), मराठी १५ प्रश्न (गुण १५) सामान्य ज्ञान ३० प्रश्न (३० गुण), बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र-सामान्यज्ञान ३० प्रश्न (३० गुण), अंकगणित- ३० प्रश्न (३० गुण), बुद्धिमत्ता चाचणी ३० प्रश्न (३० गुण). या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

अभ्यासक्रम - महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.

अभियोग्यता - या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, समायोजन/व्यक्तिमत्त्व, अवकाशीय क्षमता, कल/आवड भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी) इत्यादी उपघटक राहतील.

बुद्धिमत्ता - या घटकांतर्गत आकलन, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी इत्यादी उपघटक राहतील.

अंकगणित, संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी इ.

मराठी व इंग्रजी व्याकरण, म्‍हणी व वाक्प्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक आदी.

(लेखक ‘विद्यार्थी मित्र’ www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT