Kabaddi
Kabaddi Sakal
एज्युकेशन जॉब्स

खेलेगा इंडिया... : खेळाडूंची भूमिका आणि जबाबदाऱ्या

प्रशांत पाटील

उत्तम खेळासाठी खेळाडूची भूमिका महत्त्वाची असते. उत्तम कामगिरीसाठी शिक्षकांकडून आणि संघातल्या इतर खेळाडूंकडून खेळाडू सर्व प्रकारची मदत घेऊ शकतो.

- महेंद्र गोखले

उत्तम खेळासाठी खेळाडूची भूमिका महत्त्वाची असते. उत्तम कामगिरीसाठी शिक्षकांकडून आणि संघातल्या इतर खेळाडूंकडून खेळाडू सर्व प्रकारची मदत घेऊ शकतो. चांगल्या कामगिरीसाठी खेळाडूने खालील गोष्टी आत्मसात कराव्यात...

१. आपले ध्येय कसे ठरवावे?

२. दिलेल्या कृतीवर लक्ष केंद्रित करावे

३. खेळाच्या अंतिम निकालावर लक्ष ठेवण्यापेक्षा त्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर अधिक मेहनत घ्यावी

४. आपल्या कामगिरीमध्ये सातत्य आणि विश्वास ठेवणे

५. स्वतःवर आणि प्रशिक्षकावर विश्वास ठेवणे

खेळाडूमधील आवश्यक गुण...

१. वक्तशीरपणा : खेळासाठी हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक प्रशिक्षक आपल्या व्यग्र दिनक्रमातून प्रशिक्षणासाठी मुद्दाम वेळ देतात. त्या बदल्यात त्यांची फार मानधनाची अपेक्षा नसते. परंतु वेळ पाळणे म्हणजे त्यांनी दिलेल्या वेळेचा आदर करणे होय. त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वेळेची कदर करायला शिकायला हवे.

२. आदर असणे : सर्वसाधारणपणे वयाने लहान व्यक्तीने मोठ्या व्यक्तींना आदर देणे अपेक्षित असते. परंतु बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांबद्दल आदर नसतो. प्रशिक्षकाकडे दुर्लक्ष करणारा, त्याला उलट उत्तर देणारा, त्याच्याशी कृतघ्नपणे वागणाऱ्या खेळाडूला प्रशिक्षण देणे अशक्य असते.

३. लक्ष द्या : प्रशिक्षक काही बोलत असताना लक्ष देऊन ऐका. सराव आणि खेळावरच लक्ष केंद्रित आहे ना, हे पाहा.

४. उत्साही राहा : सरावासाठी किंवा खेळासाठी आवश्यकता आहे म्हणून उपस्थित राहू नका तर उत्साहाने सहभागी व्हा. उत्तम खेळाडू खेळाबाबतीत उत्साही असतो, आपल्या संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवतो आणि खेळाच्या ठिकाणी आनंदी असतो. उत्साही खेळाडू प्रशिक्षकांचाही उत्साह वाढवतात.

५. विश्वासार्ह रहा : हा गुण तुम्हाला खेळात खूप दूरवर घेऊन जाईल. तुमची मैदानावरची कामगिरी उत्तम असली, परंतु प्रशिक्षक तुमच्यावर अवलंबून राहू शकत नसल्यास त्याचा परिणाम संपूर्ण संघावर होऊ शकतो.

६. एकाग्रता : खेळाडूंचे लक्ष केंद्रित होण्यासाठी प्रशिक्षक प्रयत्न करतात. सरावाच्या वेळी काही लोक इतर खेळाडूंना चिअर करत असतात. अशा आवाजाने लक्ष विचलित होऊ देऊ नका. पालकांनीही मुलाचे लक्ष केंद्रित होईल यासाठी प्रयत्न करावेत.

७. खेळात सुधारणा करण्याची इच्छा : कोणताही खेळ, क्रीडाप्रकार असला तरी शिकण्याची इच्छा असणे, त्यात प्रगती करणे आणि सतत कामगिरी उंचावत राहणे ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे शिकण्याची तयारी असणे हा सर्वांत पहिला घटक आहे.

८. संघांमधील उत्तम सदस्य : संघ हे कुटुंबासारखा असतो आणि याची जाणीव संघातील प्रत्येक खेळाडूला असली पाहिजे. संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन द्या, त्यांचा उत्साह वाढवा. खेळाडू म्हणून कायमच आपल्या संघाचा विचार केला पाहिजे. संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना पाठिंबा देणे यापेक्षा उत्तम गोष्ट असू शकत नाही.

९. खेळाचा आनंद घेणे : खेळातून मुलांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारी जीवनमूल्ये मिळतात. खेळाडूला खेळातून आनंद मिळतो तेव्हा तो त्यामध्ये चांगली कामगिरी करू शकतो आणि उत्तम परिणाम साधू शकतो.

१०. पालकांचा पाठिंबा : वरील सर्व गोष्टींसाठी पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. असे पालक प्रशिक्षणामध्ये पूर्ण स्वातंत्र्य देतात आणि आवश्यक तेथे मदत करायला तयार असतात. मुलांना वेळेवर सरावासाठी आणणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांना खेळाचा आनंद घ्यायला शिकवणारे पालक, प्रशिक्षकाला कायमच हवेहवेसे वाटतात. प्रशिक्षकाची पद्धत पालकांना योग्य वाटत नसल्यास त्यांच्याशी वैयक्तिकरीत्या बोलावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT