Merit List
Merit List sakal
एज्युकेशन जॉब्स

एमबीए अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी होणार जाहीर

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

राज्यात एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

पुणे - राज्यात एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन संस्था, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांमधील व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीए/एमएमएस), तसेच सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, रिसर्च ॲण्ड आंत्रप्रेन्युअरशिप एज्युकेशन (मुंबई) येथील पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे.

या अभ्यासक्रमासाठी ‘एमएएच-एमबीए/एमएमएस-सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. परंतु अन्य प्रवेश परीक्षा दिलेले आणि सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्या होतील. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून याच दिवशी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली फेरी १९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान, दुसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर आणि तिसरी फेरी १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमाचे वर्ग १० नोव्हेंबरपासून सुरू होतील. तसेच संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांना प्रवेशाची माहिती अपलोड करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक -

तपशील : कालावधी

- ऑनलाइन नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे (ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी ही प्रक्रिया २३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील) : १३ ऑक्टोबर

- तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १५ ऑक्टोबर

- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे : १६ ते १८ ऑक्टोबर

- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे,  : १९ ऑक्टोबर

प्रवेश फेरीनिहाय तपशील आणि कालावधी :

तपशील : पहिली फेरी (कालावधी) : दुसरी फेरी (कालावधी) : तिसरी फेरी (कालावधी)

- प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १९ ऑक्टोबर :  १ नोव्हेंबर : १० नोव्हेंबर

- ऑनलाइन अर्ज सबमिट करणे, अर्ज निश्चिती, पसंतीक्रमाचे पर्याय नोंदविणे : २० ते २५ ऑक्टोबर : २ ते ४ नोव्हेंबर : ११ ते १३ नोव्हेंबर

- प्रोव्हिजनल ॲलॉटमेंट जाहीर करणे : २८ ऑक्टोबर : ६ नोव्हेंबर : १४ नोव्हेंबर

- मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संबंधित संस्थांनी देणे : २९ ते ३१ ऑक्टोबर : ७ ते ९ नोव्हेंबर : १५ ते १७ नोव्हेंबर

प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT