MPSC
MPSC sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC : बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे क्लास चालकांना येणार पुन्हा तेजीचे दिवस

महेश जगताप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत बदल करताना बहुपर्यायी परीक्षा पद्धत करून ती वर्णनात्मक केली.

स्वारगेट - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत बदल करताना बहुपर्यायी परीक्षा पद्धत करून ती वर्णनात्मक केली यामुळे राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मत मतांतरे झाली. त्याचबरोबर या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याने स्पर्धा परीक्षांच्या शकवणी वर्गाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे क्लास चालकांना मात्र पुन्हां मोठ्या प्रमाणात तेजीचे दिवस येणार आहेत.

दहा वर्षांपूर्वीही राज्यसेवेचा अभ्यासक्रम हा वर्णनात्मक स्वरूपाचा होता. या परीक्षा पद्धतीमध्ये लिखाणाला असाधारण महत्त्व असते त्याचबरोबर अभ्यासक्रमाचीही व्याप्ती असते. हा व्यापक अभ्यास करताना प्रत्यक्ष कामाच्यावेळी आवश्यक आकलन क्षमता, बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, विश्लेषणक्षमता, विषयाची समज आणि कार्यवाही, विचारांची स्पष्टता, संभाषण कौशल्य, बुद्धिमत्तेची प्रगल्भता या सर्व गुणांचा कस लागत होता. मात्र, २०११ -१२ साली परीक्षा ह्या बहुपर्यायी झाल्या व त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्व अध्ययनायाला पसंती दिली आणि शिकवणी वर्गाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला होता मात्र पुन्हा एकदा राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची झाल्यामुळे शिकवण्या कडे विद्यार्थी वर्ग वळला आहे.

आधी परीक्षा बहुपर्यायी असल्यामुळे पुस्तके वाचून अभ्यासाला दिशा देता येत होती. मात्र, आत्ता वर्णनात्मक परीक्षा पद्धत झाल्यामुळे संकल्पना समजून, उमजून घेऊन त्या प्रत्यक्ष आपण पेपर मध्ये कशा मांडतो आहोत हे महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाची दिशा योग्य आहे का? आपण प्रश्नांच्या उत्तराची मांडणी करत असताना ते योग्य प्रकारे मांडली जात आहेत का ते पाहण्यासाठी शिकवण्या गरजेच्या झाल्या आहेत असे सकाळशी बोलताना मंगेश कदम या विद्यार्थ्याने आपले मत मांडले.

परीक्षा पद्धत बदलल्यामुळे आत्ता अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकांचाही पॅटर्न बदलत आहे. याआधी बहुपर्यायी परीक्षा पद्धतीला पूरक असा पुस्तकांचा पॅटर्न बदलला होता. याला विद्यार्थ्यांच्या भाषेत वन लाइनर पॅटर्न असेही म्हटले जात होते. मात्र, आत्ता वर्णनात्मक परीक्षा पद्धत झाल्यामुळे एकूणच पुस्तकाची दिशा बदलावी लागणार आहे.

साधारण शिकवणी फी - साठ हजार ते एक लाख रुपये

विद्यार्थ्यांची शिकवणी वरील डिफेन्सिसी नक्कीच वाढणार आहे. विद्यार्थ्यांची क्लास लावण्याच्या संख्याही विस्तृत अभ्यासक्रमामुळे वाढणार आहे. मात्र त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षापासून माघार घेण्याचा निर्णयही घेतला आहे.

- ज्ञानेश्वर पाटील ( क्लासचालक)

विद्यार्थ्यांना आता ऑनलाइनवर पुस्तके वाचून त्याचा फारसा उपयोग होणार नाही विस्तृत व व्यापक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजून त्याचे योग्य प्रकारे आकलन केले तरच परीक्षेमध्ये लिहिता येणार आहे त्या दृष्टिकोनातून सर्व स्पर्धा परीक्षा प्रकाशकांना बदलावे लागणार आहे.

- डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर (स्पर्धा परीक्षा प्रकाशक)

अचानक बदललेल्या परीक्षेच्या पॅटर्नमुळे आम्ही गोंधळले आहोत. या नवीन पॅटर्ननुसार परीक्षेत सज्ज होण्यासाठी शिकवणीची गरज लागणार आहे. नवीन परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात कष्ट व स्मार्ट अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर कोणती पुस्तके वाचायची ती कशा पद्धतीने वाचली पाहिजे यासाठी शिकवणी आम्हाला लावण्याची गरज भासणार आहे.

- नागेश मदनावे (स्पर्धा परीक्षा विद्यार्थी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT