Mumbai-University
Mumbai-University sakal media
एज्युकेशन जॉब्स

UGC : आयडॉलच्या एमएमएस, एमसीएसह १७ अभ्यासक्रमाला मिळाली परवानगी

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (IDOl) १७ अभ्यासक्रमाला (syllabus) विद्यापीठ अनुदान (university grant) आयोगाने परवानगी दिली आहे. यात एम.ए. भूगोल व एमएमएस (MBA) या नवीन अभ्यासक्रमाचां (New syllabus) समावेश आहे. हे अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरू होणार असून यातील पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्षाचे वेळापत्रक (Degree timetable) लवकरच जाहीर केले जाणार आहे. तर पुढील वर्षी एमए मानसशास्त्र, एमएसडब्ल्यू, पत्रकारिता (journalism) यासारखे इतरही अनेक नवीन अभ्यासक्रम आयडॉलमधून सुरु केले जाणार असल्याचे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर (dr prakash mahanavar) यांनी सांगितले.

कोविडमुळे यूजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या जुलै सत्राची सुरुवात नोंव्हेंबर पासून सुरु करण्याचे ठरविले. यानुसार यूजीसीने या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमाच्या मान्यतेची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास यूजीसीने परवानगी दिली आहे. मागील वर्षी १५ अभ्यासक्रमास परवानगी देण्यात आली होती.

पदवी स्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी संगणकशास्त्र व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र , एमकॉम, एमएस्सी आयटी, एमसीए व एमएमएस (एमबीए ) याच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एमएमएस (एमबीए ) व एमसीए हे दोन अभ्यासक्रम व्यावसायिक असल्याने याची प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाईल. या दोन्हीही अभ्यासक्रमाला युजीसीबरोबरच एआयसीटीईचीही मान्यता मिळाली आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस (एमबीए ) च्या ७२० जागा तर एमसीएच्या २००० जागांना मान्यता दिली आहे.

यातील एमसीए हा अभ्यासक्रम यावर्षीपासून दोन वर्षाचा करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ प्रथमच एमएमएस (एमबीए) हा अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून चालविणार आहे. यासाठी आयडॉलला मुंबई विद्यापीठाची बजाज व्यवस्थापन संस्था व अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्था शैक्षणिक सहकार्य करीत आहेत. देशात अनेक विद्यापीठे दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थापनाचा एमबीए अभ्यासक्रम चालवितात. आता एआयसीटीई व यूजीसीची याला परवानगी मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे एमएमएस (एमबीए ) करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT