Online Admission
Online Admission Sakal media
एज्युकेशन जॉब्स

राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी एक संधी

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील कृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या कृषी पदवी अभ्यासक्रमाकरिता एक अतिरिक्त चौथी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविणार आहे.

पुणे - राज्यातील कृषी विद्यापीठांशी (Agriculture University) संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या कृषी पदवी अभ्यासक्रमाकरिता एक अतिरिक्त चौथी ऑनलाइन प्रवेश (Online Admission) फेरी राबविणार आहे. या चौथ्या अतिरिक्त प्रवेश फेरीतंर्गत प्रवेश वाटप यादी मंगळवारी (ता.४) प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) (CET Cell) दिली आहे.

प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या कृषी पदवी अभ्यासक्रमाकरिता नियोजित वेळापत्रकानुसार तीन ऑनलाइन प्रवेश वाटप फेऱ्या आतापर्यंत राबविल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार जागेवरील प्रवेश फेरीपूर्वी (स्पॉट राऊंड) एक अतिरिक्त चौथी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीत प्रवेशाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात पाच आणि सहा जानेवारी या कालावधीत प्रवेशाकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

प्रवेश प्रक्रियेतंर्गत ‘जागेवरील प्रवेश फेरीसाठी’ जागांचा तपशील ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध करणार आहे. तर राज्यात दहा ते १३ जानेवारी या कालावधीत २० प्रवेश प्रक्रिया केंद्रांवर प्रवेशाची प्रक्रिया राबविणार आहे. संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याकरिता उपलब्ध जागांची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच १७ ते १९ जानेवारी या कालावधीत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही, म्हणून समाजाच्या मनात रोष - नसीम खान

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT