Latest Marathi News : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Latest Maharashtra Politics News: देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर बॉम्ब ठेवल्याच्या निनावी कॉलनं खळबळ

एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, "ज्या व्यक्तीने मुंबईकरांसाठी आणि देशात दहशतवाद पसरवणाऱ्याविरोधात लढा दिला, अशा वकिलाला भाजपने तिकीट दिले आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामागील सूत्रधार याकुब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एक सच्चा मुंबईकर आता संसदेत पोहोचेल, असं शेलार म्हणाले.

पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

इंडिया आघाडीने पाच वर्षांमध्ये पाच पंतप्रधान करण्याचा प्लॅन केल्याचं पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसचं सरकार आलं तर प्रत्येक वर्षी देशाला नवीन पंतप्रधान मिळेल. त्यांनी कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगडमध्ये अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला करुन दाखवला होता, असा घणाघात पंतप्रधानांनी केला.

भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

कोल्हापुरात जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोल्हापूरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब म्हटले जाते. इथल्या स्थानिक तरुणांमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. जर मी तुम्हाला फुटबॉलच्या भाषेत सांगायचे झाले, तर काल दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर आहे.

 Lok Sabha Election : कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरात तपोवन मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाती सुरूवात मराठीत केल्याचे पाहायला मिळाले.

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून पुण्याचे महापौर झाले होते, २०१० ते २०१२ या कालावधीत पुण्याचे महापौर पद त्यांनी भूषवले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत. पुण्याचे पहिले शीख महापौर मोहनसिंग राजपाल झाले होते.

मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून येथे वर्षा गायकवाड यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल 

महाविकास आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रियांका गांधी उगगीर येथे दाखल झाल्या आहेत।

Onion Export: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

केंद्र सरकारने शनिवारी सांगितले की, निर्यातीवर बंदी असतानाही 99,150 टन कांदा सहा देशांमध्ये पाठवण्याची परवानगी दिली आहे. केंद्राने पश्चिम आशिया आणि काही युरोपीय देशांच्या निर्यात बाजारपेठेसाठी 2,000 टन खास पिकवलेल्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीलाही परवानगी दिली आहे. या निर्णयावर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, 'गेल्या अनेक दिवसापासून कांदा प्रश्नावर शेतकरी आंदोलन करत होते, पण सरकार ऐकायला तयार नव्हतं. जशा लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या आणि भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने मग सरकार जागं झालं आणि हा निर्णय घेतला. याचं आम्ही स्वागत करतो. पण या निर्णयाला खूप उशीर झाला आहे.'

Delhi Excise Policy Case: सीएम अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या प्रतिज्ञापत्राला सुप्रीम कोर्टात दाखल केले उत्तर 

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी त्यांनी आपल्या अटकेची पद्धत आणि वेळेबाबत प्रश्न उपस्थित केले.

निवडणुकीबाबत आचारसंहिता लागू झाली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांची अटक ईडीच्या मनमानीबद्दल बरेच काही सांगून जाते, असे ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, AAPने पैसे किंवा लाच मिळाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिज्ञापत्रात असे लिहिले आहे की, 'आप'ला एक रुपयाही मिळालेला नाही.

Lok Sabha Elections: या निवडणुकीत नोकऱ्या, बेरोजगारी आणि महागाई हे सर्वात मोठे मुद्दे- डिंपल यादव

एका टीव्ही चॅनलशी बोलताना समाजवादी पार्टीच्या नेत्या डिंपल यादव म्हणाल्या की, या निवडणुकीत नोकऱ्या, बेरोजगारी आणि महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. बाकी काही नाही. जनता भाजप सरकारला कंटाळली आहे. कारण भाजपने जी काही आश्वासने दिली होती, त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. डिंपल म्हणाल्या की, भाजप म्हणायची की काळा पैसा परत येईल, काळा पैसा परत आला काय़, 15 लाख रुपये बँक खात्यात येतील, असं झालंय का?

SC VVPAT Judgment: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "अशी वक्तव्ये करण्याची पीएम मोदींची सवय आहे. जे आवाहन माझ्या पक्षाकडून करण्यात आले नव्हते. ते स्वयंसेवी संस्था आणि वकिलांनी मिळून केले होते.”

Naseem Khan: काँग्रेस नेते नसीम खान पक्षावर नाराज, नाराजी दूर करण्यासाठी वर्षा गायकवाड घेणार भेट

काँग्रेस नेते नसीम खान यांनी महाविकास आघाडीने राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले की, काँग्रेस एकही मुस्लिम उमेदवार उभा करू शकली नाही हे अत्यंत चिंताजनक आहे. आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mamata Banerjee Injured: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शनिवारी (२७ एप्रिल) निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ममता दुर्गापूरला पोहोचल्या होत्या, तिथे हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्या जखमी झाल्या आहेत.

PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील हॉटेल, लॉज याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कोबिंग ऑपरेशन द्वारे तपासणी केली जाते. २९ तारखेला पुण्यातील रेस कोर्स या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉजवर संशयस्पद राहणाऱ्या नागरिकांची पोलीस चौकशी करत आहेत.

आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

भोर तालुक्यातील एका सभेत बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही,

मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही, असे वक्तव्य कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केले आहे. गुजरात राज्यातील वलसाडमध्ये बोलताना त्यांनी मोदींवर टिका केली आहे.

Jharkhand Bus Accident : झारखंडच्या रांची सदर सबडिव्हिजनमध्ये स्कूलबसचा अपघात

झारखंडच्या रांची सदर सबडिव्हिजनमध्ये एका स्कूलबसचा अपघात झाला आहे. या अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Amanatullah Khan : आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना जामीन मंजूर

आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना जामीन मंजूर झाला आहे. खान यांना मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अटक झाली होती. दिल्लीच्या राऊज एवेन्यू न्यायालयाने आमदार अमानतुल्ला खान यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला

अँटी करप्शन ब्यूरोने (एसीबी) आप आमदार अमानतुल्लाह खान यांच्या विरोधात दिल्ली वक्फ बोर्डाच्या कामकाजात आर्थिक हेराफेरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात इडीने अमानतुल्लाह विरोधात कारवाई करत त्यांना 18 एप्रिलला अटक केली होती.

Naseem Khan : काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही, म्हणून समाजाच्या मनात रोष

काँग्रेसचे स्टार प्रचारक नसीम खान यांनी आपल्या प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे समाजात नाराजी होती. समाजाची भावना पाहून आपण या पदाचा राजीनामा दिल्याचं ते म्हणाले.

Narendra Modi in Pune : पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ⁠शहरातील हॉटेल, लॉजेस याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कोबिंग ऑपरेशनद्वारे तपासणी केली. यासोबतच शहरात लॉजवर संशयास्पदरित्या राहणाऱ्या नागरिकांची देखील पोलीस चौकशी करत आहेत.

Nainital Forest Fire : नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण

नैनीतालमध्ये लागलेल्या वणव्याला आटोक्यात आणण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. लष्कराच्या MI 17 हेलिकॉप्टरच्या मदतीने जंगलात पाणी टाकलं जात आहे.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन येथे बैठक

महाविकास आघाडीतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज दुपारी 3 वाजता शिवसेना भवन येथे बैठक होणार आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अनिल देसाई यांचा प्रचार स्वतः वर्षा गायकवाड करत होत्या. परंतु आता वर्षा गायकवाड उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याने, पुढील नियोजनासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.

दिलीप वळसे पाटलांवर एक महिन्यापासून उपचार; तब्येत ठीक असल्याची माहिती

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू होते. आता आपली तब्येत व्यवस्थित असून, पुढील काही दिवसातच आपण पुन्हा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत असं ते म्हणाले.

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

तामिळनाडूतील उलंदूरपेट येथे एका बसचा अपघात झाला. या बसमधील 15 प्रवाशी यामध्ये जखमी झाले.

Archery Gold : आर्चेरीमध्ये भारताचा डंका! महिला-पुरूष दोन्ही संघांनी जिंकलं 'गोल्ड'

शांघायमध्ये होत असलेल्या आर्चेरी विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या महिला आणि पुरूष टीमने मिळून आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांवर नाव कोरलं आहे.

Bus Accident : इंदूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला अपघात; १०० फूट दरीत कोसळली बस

इंदूरहून अकोल्याकडे जात असणाऱ्या खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात ही बस १०० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात २८ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदूर येथील रॉयल ट्रॅव्हल्सची ही बस असल्याचं समजत आहे.

Sanjay Raut : गादीपुढे मोदी कोणी नाही; भाजप त्या गादीचा अपमान करतंय

शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यावरुन संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. शाहू महाराजांना बिनविरोध निवडून देण्याची आमची इच्छा होती. मात्र, त्यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने मोदी कोल्हापुरात येत आहेत. ही छत्रपतींची गादी आहे, या गादीपुढे मोदी कोणी नाही. भाजप त्या गादीचा अपमान करत आहे, असं ते म्हणाले.

TMC writes to Chief Electoral Officer: सीबीआयने निवडणुकीदिवशी छापा टाकल्याने टीएमसीचे निवडणूक आयोगाला पत्र

सीबीआयने निवडणुकीच्या दिवशी संदेशखाली येथे छापा टाकला असल्याने टीएमसीने पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याप्रकरणी पत्र लिहिलं आहे.

Airports in the country: चार विमानतळे उडवून देण्याचा आलेला ई-मेल खोटा

कोलकातासह चार विमानतळे उडवून देण्याचा आलेला ईमेल खोटा असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. यासंदर्भात २६ एप्रिलला ईमेल आला होता.

Sharad Pawar: शरद पवारांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन घेतले दर्शन

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत. आज त्यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ते आज शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत.

Uddhav Thackeray: ठाकरे गटाचा अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

मशाल प्रचार गीतामधील 'जय भवानी' शब्द हटवण्याच्या आदेशाबाबत फेरविचार करण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला अर्ज केला होता. निवडणूक आयोगाने हा अर्ज फेटाळला असल्याचं कळतंय.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांची आज लातूरमध्ये सभा

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेणार आहेत. काँग्रेसने लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूरमध्ये सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या उमेदवारासाठी कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत. कोल्पापूरमध्ये महाआघाडीच्या शाहू महाराजांविरोधात संजय मंडलिक मैदानात आहेत.

देशात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com