Polytechnic Admission sakal media
एज्युकेशन जॉब्स

पॉलिटेक्निकच्या पहिल्या फेरीत 40 हजाराहून अधिक जणांचे प्रवेश

उद्यापासून दुसरी व अंतिम फेरीसाठी प्रवेश

संजीव भागवत

मुंबई : तंत्र शिक्षण संचालनालयानेच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय, खाजगी आणि अनुदानित महाविद्यालयात पॉलिटेक्निक (polytechnic) या दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या (degree syllabus) पहिल्या प्रवेश फेरीत 40 हजार 965 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रवेश (student admission) घेतले आहेत. प्रवेशाच्या दुसऱ्या आणि अंतिम प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म (option form) भरण्याची प्रक्रिया ही 28 सप्टेंबर पासून होणार असून त्यानंतर राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील अभ्यासक्रम हे 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे विभागाने नियोजन केले आहे.

पॉलिटेक्निक या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तब्बल ६० हजार जागा उपलब्ध आहेत. राज्यातील विद्यार्थ्यानी या फेरीत आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ३६६ महाविद्यालयात १ लाख १ हजार जागा आहेत. या जागावर यावर्षी सुमारे ८८ हजार अर्ज आले होते. त्यापैकी पहिल्या कॅप राऊंडमध्ये ७१ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरुन प्रवेशासाठी आपले अर्ज भरले होते.

त्यामधील ५५ हजार ६३३ विद्यार्थ्यांना जागा अॅलॉट झाल्या होत्या यापैकी ४० हजार ९६५ विद्यार्थ्यांनी फ्रीज करुन आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यानंतर आता दुसरी फेरी होणार आहे. यासाठी सुमारे ६० हजार जागा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी पसंतीक्रम विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. ३० सप्टेंबरला जागा वाटप होतील त्यानंतर दुसऱ्या फेरीचे प्रवेश होतील. तर उर्वरित प्रवेश हे १३ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT