Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Maharashtra Monsoon Updates: अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा परिणाम: महाराष्ट्रात ५ ते ९ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, कोकण व नाशिकसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी..

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने ५ ते ९ जुलै दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com