
वरळीतबोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सरकार सध्या केवळ गाजर दाखवत आहे, पण लोकांच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे असंवेदनशील आहे. हे सरकार महाराष्ट्राचं नाही, तर निवडणूक आयोगाचं आहे, त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांची अजिबात फिकीर नाही. काल मराठी जनतेनं एकत्र येऊन ताकद दाखवली आणि त्यामुळे महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. ठाकरे यांनी संजय गायकवाड आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही निशाणा साधत त्यांचं वर्तन "नौटंकी" असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “पत्र लिहिण्याऐवजी थेट फोन करू शकतात, संवादच नाही काय?”
तसेच, प्रतापराव जाधव यांच्यावरही टीका करत त्यांनी भाजपला "मराठी माणसांचा खरा दुश्मन" ठरवलं. भाजपने मराठी माणसांची तुलना पाकिस्तान्यांशी केली असल्याने, त्यांनी जनतेची माफी मागावी, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.