Business
Business sakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरी/बाजारपेठ : हीच ती योग्य वेळ!

सकाळ वृत्तसेवा

- सचिन आरोंदेकर

एखादा नवीन उद्योग, व्यवसाय किंवा करिअरसाठी क्षेत्र निवडताना संबंधित व्यवसायाला किंवा शिक्षणाला भविष्य काय असेल याचा अंदाज आपण घेत असतो. त्यानुसारच त्या उद्योग-व्यवसाय किंवा करिअरचे क्षेत्र यांची निवड करतो. नव्या तंत्रज्ञानामुळे आता दर दोन ते तीन वर्षात संधी बदलत आहेत. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये गुंतवणूक, स्टार्ट अप किंवा या क्षेत्रात येण्यासाठी शिक्षण घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. येत्या दोन तीन वर्षात युरोप अमेरिकेप्रमाणे भारतातही या दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असेल.

‘मेक इन इंडिया’मुळे भारतात नव उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. विविध क्षेत्रातील स्टार्ट अपचा प्रयोगही यशस्वी होत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानावर आधारित विशेषतः ‘सोल्यूशन बेस’ स्टार्ट अपची संख्या वाढत आहे. या स्टार्ट अपचा फायदा मोठ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन, विक्री आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी होत आहे. एआय आणि रोबोटिक्स क्षेत्रातही स्टार्ट अप येत आहेत. त्यांनाही चांगल्या मनुष्यबळाची गरज भासणार आहे. सध्या एआय आणि रोबोटिक्सचा वापर जपान, पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.

युरोप आणि अमेरिकेत लेबर महाग आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या रोबोटचा वापर वाढवत आहेत. भारतात याचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. इथले उद्योग या नव्या तंत्रज्ञानाचा अंदाज घेत आहेत, येत्या दोन तीन वर्षांत हा वापर आरोग्य, विमानसेवा, सेवा, उद्योग अशा क्षेत्रात वाढलेला असेल. त्यामुळे येणाऱ्या या संधीचा लाभ घेण्यासाठी आपली तयारी असायला हवी. विद्यार्थी, नव्याने उद्योगात येऊ इच्छिणाऱ्यांनी या भविष्यवेधी क्षेत्राचा विचार आताच करायला हवा. तो केला तर तुम्हाला संधींची कमतरता भासणार नाही.

‘आर्टिलिजंट’ ही आमची कंपनीही पाच वर्षांपूर्वीचे स्टार्ट अपच आहे. पाच मराठी मुलांच्या कल्पनेतून तिचा उदय झाला, आज कंपनी रोबोटिक्स, एआय सोबतच मोठमोठ्या उद्योगांना बिझनेस सोल्यूशन देण्यासाठी आघाडीवर आहे. ‘आर्टिलिजंट’ बंगळूर विमानतळावर प्रवाशांना सेवा देणारा रोबोट पुरविणारी देशातील पहिली कंपनी ठरली. याशिवाय कोलगेट, इन्फोसिस, टीसीएस एलअँडटी, कोकाकोला अशा विविध कंपन्यांना बिझनेस सोल्यूशन देण्याचे काम करते.

यात एआय आणि रोबोटिक्स तर असतेच पण इतर टेक्नॉलॉजीचाही समावेश असतो. या क्षेत्राला आपल्या देशातील सध्याचा प्रतिसाद ‘नाईस टू हॅव’कडून ‘मस्ट हॅव’च्या दिशेने आहे. त्यामुळे ‘आर्टिलिजंट’प्रमाणेच या क्षेत्रात नवीन आयडिया, क्रिएटिव्हिटी घेऊन येणाऱ्या नवीन स्टार्ट अपला संधी राहणार आहे.

भारत कृषिप्रधान देश आहे. या क्षेत्रातही आता मजुरांची कमतरता आहे. सध्या ज्याप्रमाणे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात रुग्णालयात रोबोट दिले आहेत, जे रुग्णांना मार्गदर्शन करतात. तज्ज्ञ डॉक्टर रोबोटवर लॉगिन करून रुग्णांची प्रगती पाहू शकतात, शस्त्रक्रियेसाठी मदत करतात. तशाच धर्तीवर शेतीसाठी रोबोटवर तज्ज्ञांचा सल्ला, पिकांची देखरेख करू शकतील.

बाजाराची माहिती देऊ शकतील. सध्याच्या तंत्रज्ञानात असा सेवा ग्रामीण भागात देणे शक्य आहे. त्यामुळे एआय, रोबोटिक्सचा वापर करण्यासाठी व्यापक क्षेत्र खुले आहे. गरज आहे ती यासाठी स्वतःला तयार करण्याची. म्हणूनच भविष्यासोबत ज्यांना स्वतःची प्रगती करायची आहे, त्यांना सुरवात करण्याची हीच योग्य वेळ आहे.

(लेखक आर्टिलिजंट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक (स्टॅटेस्टिक अलायन्सेस) आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT