set exam sakal
एज्युकेशन जॉब्स

SET Qualifying Exam : सेटची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जानेवारीत

राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे.

सम्राट कदम

पुणे - राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

विद्यापीठाकडून एप्रिल २०२४ मध्ये शेवटच्या ऑफलाइन सेटचे आयोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची घोषणा २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसंबंधीची घोषणा होणे अपेक्षीत होते. अखेरीस सेट विभागाच्या वतीने संभाव्य तारखेची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो.

त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे, आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या विद्यापीठामध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला वेग आला असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती झाल्यानंतरच ऑनलाइन अर्जांना सुरवात होणार आहे. विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते.

शेवटची ऑफलाईन ‘सेट’-

मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे नेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत शंका होती. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यात एक बैठक झाली. त्या बैठकीत सर्वसाधारणपणे एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी.

मात्र, त्यानंतरच्या पुढील सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ७ एप्रिल २०२४ मध्ये शेवटची ऑफलाईन (पेन आणि पेपर) परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर ४० वी सेट परीक्षा ऑनलाइन (संगणकावर) पद्धतीने आयोजित होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सेटच्या ३९ व्या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. ७ एप्रिल २०२४ रोजी पार पडणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्याला वेग आला आहे. ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल, त्यानंतर लगेचच उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ खुले करण्यात येईल.

- डॉ. बी. पी. कापडणीस, समन्वयक, सेट विभाग

आकडे बोलतात...

- एकूण विषय - ३२

- सहभागी शहरे - १७

- परीक्षा केंद्रे - २६२

- सहभागी विद्यार्थी (अंदाजे) - १,२५,०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT