SSC GD Constable
SSC GD Constable esakal
एज्युकेशन जॉब्स

Good News : GD कॉन्स्टेबल परीक्षेची अधिसूचना 'या' महिन्यात होणार जाहीर

बाळकृष्ण मधाळे

SSC GD Constable 2021 : कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) घेण्यात येणाऱ्या जीडी भरती परीक्षेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा अनेक उमेदवार करीत आहेत. SSC कॅलेंडरनुसार, या परीक्षेची अधिसूचना 25 मार्च रोजी जाहीर होणार होती. मात्र, त्या तारखेला ती जाहीर होऊ शकली नाही. त्यानंतर ही अधिसूचना मेच्या पहिल्या आठवड्यात आयोगाने जारी केली, परंतु, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे तेव्हा ही ती रद्द करण्यात आली. (ssc-gd-constable-2021-notifications-can-be-released-this-month-on-ssc-nic-in)

कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) घेण्यात येणाऱ्या जीडी भरती परीक्षेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा अनेक उमेदवार करीत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते. ही अधिसूचना जून किंवा जुलैमध्ये जारी होण्याची शक्यताही आहे. त्याचबरोबर SSC GD Constable 2021 च्या माध्यमातून 40 हजाराहून अधिक पदांची भरती होईल, असाही अंदाज आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप एसएससीकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.

SSC GD Constable 2021 च्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 वी पास असावा. यासह अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. परंतु, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत देण्यात येईल आहे.

या परीक्षेत CBT, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (PST), फिजिकल एफिशियन्सी टेस्ट (PET) आणि शेवटी मेडिकल टेस्टनंतर उमेदवारांची निवड केली जाते. या भरतीद्वारे BSF, CRPF, SSB, NIA, CISF, ITBP, SSF आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये कॉन्स्टेबल म्हणून उमेदवारांची नेमणूक केली जाते. अधिकृत अधिसूचना दिल्यानंतर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल, असे स्पष्ट केले आहे.

ssc gd constable 2021 notifications can be released this month on ssc nic in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT