SSC HSC Board exam  esakal
एज्युकेशन जॉब्स

SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीची प्रक्रिया होणार सुरू

दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत फॉर्म नंबर १७ भरून खासगीरीत्या ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे गुरुवारपासून (ता.१०) तर दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे येत्या सोमवारपासून (ता.१४) ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्य पद्धती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.

दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी सध्या संपर्क केंद्रामार्फत नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये संपर्क केंद्रामार्फत सर्व कार्यवाही राबविण्यात येत होती.

मात्र प्रचलित पद्धतीमधील अडचणींचा, त्रुटींचा विचार करून ही योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभदायी, विद्यार्थी केंद्रित व्हावी, या दृष्टीने सध्याच्या संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज सर्व मान्यता स्वीकारण्याची प्रचलित पद्धत बंद करण्यात आली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यात येतात; त्याप्रमाणे आता दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्य पद्धती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरू केल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरून घेण्यात येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घेऊन शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना दहावीच्या परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे ओक यांनी सांगितले. याबाबत माहिती मंडळाच्या ‘http://mahahsscboard.in’ संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन करण्यासाठी कालावधी -

तपशील : बारावी : दहावी

- विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरणे : १० ऑगस्ट ते ११ सप्टेंबर : १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर

- विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे : १२ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर : १७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर

- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे : १५ सप्टेंबर : १५ सप्टेंबर

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :

दहावी : http://form17.mh-ssc.ac.in

बारावी : http://form17.mh-hsc.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! पुढील 5 दिवस काळजीचे... या जिल्ह्यांना रेड अलर्ट! मुंबई-पुण्याची परिस्थिती कशी असेल?

PM मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प अन् मेलोनींच्या रँकिंगमध्ये घसरण; कोण कितव्या स्थानी?

Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं

Latest Maharashtra News Updates : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latur Crime: ‘एचआयव्ही’बाधित मुलीवर अत्याचार; चार महिन्यांनी गर्भपाताचा आरोप, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT