SSC HSC Board exam
SSC HSC Board exam  esakal
एज्युकेशन जॉब्स

SSC HSC Exam : दहावी-बारावीची शुक्रवारी होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलली

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.२८) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा पेपर पुढे ढकलला असून हा पेपर आता ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे. यात दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होत आहे.

परंतु सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देखील जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर दहावीच्या पुरवणी परीक्षेतील शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्य शास्त्र हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

हा पेपर शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार होता. आता हा पेपर ३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : वाराणसीत पंतप्रधान मोदींची मोठी आघाडी! पण यूपीमध्ये भाजपला धक्का

Raj Thackeray: राज ठाकरेंचा करिष्मा चालला; जिथे सभा, तिथे महायुतीचे उमेदवार आघाडीवर!

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे मोठ्या आघाडीवर, २६ हजार मतांचा फरक

Lok Sabha Election 2024: कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा पराभूत! मतदारांनी दिला दणका

Lok Sabha Election Result: भाजपची धाकधूक वाढली; एक्झिट पोल फेल तर राजकीय विश्लेषकांचे अंदाज गडबडले

SCROLL FOR NEXT