खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) सामान्य कुटुंबातील मुला-मुलींना लाखोंचे डोनेशन असलेल्या खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील एकूण पटाच्या २५ टक्के जागा अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.
RTE Admission Deadline
RTE Admissionsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) सामान्य कुटुंबातील मुला-मुलींना लाखोंचे डोनेशन असलेल्या खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील एकूण पटाच्या २५ टक्के जागा अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. सोलापूर जिल्ह्यातील २८५ खासगी स्वंयअर्थसहाय्यिता शाळांमध्ये दोन हजार ८७२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. परंतु, त्यासाठी जिल्ह्यातून तब्बल सहा हजार ७०९ विद्यार्थ्यांनी (दुपटीपेक्षा जास्त) अर्ज केले आहेत.

साेलापूरसह राज्यभरात १० हजारांवर नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळा आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पालकांना दरवर्षी किमान ५० हजार ते दीड लाखांपर्यंत शुल्क मोजावे लागते. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये प्रवेश घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशावेळी ‘आरटीई’च्या लॉटरीत ज्यांचा क्रमांक लागतो आणि पात्र विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये मोफत प्रवेश द्यावा लागतो.

इयत्ता पहिलीत प्रवेश मिळाल्यावर पुढे आठवीपर्यंत त्या विद्यार्थ्याला एक रुपया देखील प्रवेश शुल्क द्यावे लागत नाही. एकूण अर्जदारांची लॉटरी काढली जाते. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्या शाळेत प्रवेश दिला जातो. यंदा सोलापूर जिल्ह्यातील एकूण जागांच्या दुप्पट अर्ज प्राप्त आले आहेत. त्यामुळे मोफत प्रवेशाची लॉटरी कोणाला लागणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

तालुकानिहाय शाळा, जागा, अर्ज

  • तालुका शाळा जागा एकूण अर्ज

  • अक्कलकोट १३ १२१ २१७

  • बार्शी १८ ३४९ ८४५

  • करमाळा २६ १९८ २६६

  • माढा ३४ ३२२ ६९२

  • माळशिरस ४६ ३५६ ५२९

  • मंगळवेढा १२ १२४ १०९

  • मोहोळ १७ १७८ २४३

  • पंढरपूर ४५ ४२२ ८१६

  • सांगोला २१ २१७ ३३४

  • उत्तर सोलापूर १७ १६२ ८३२

  • दक्षिण सोलापूर ०९ १५६ २४१

  • सोलापूर शहर १७ २५७ १,५८५

  • एकूण २८५ २,८७२ ६,७०९

पालकांच्या मोबाईल येणार मेसेज

‘आरटीई’ प्रवेशाची लॉटरी एप्रिल महिन्यातच जाहीर होणार आहे. अर्जदार पाल्यांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर प्रवेशाचे मेसेज येतील. त्यात त्यांना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे हे दिलेले असणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे हेलपाटे न मारता त्यांना घरबसल्या ‘आरटीई’ प्रवेशाच्या लॉटरीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com