Exam
Exam  esakal
एज्युकेशन जॉब्स

कमी गुण पडलेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी!

तात्या लांडगे

कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.

सोलापूर : कोरोनातील विविध अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा सुरुवातीला अभ्यास होऊ शकला नाही. काही महिन्यांपासून ऑफलाइन वर्ग सुरु झाले, परंतु पूर्ण अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गातून शिकविता आला नाही. त्यामुळे कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच आजारपणामुळे परीक्षा (Exam) देता न आलेल्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैअखेरीस होईल.

कोरोनाची (Corona) एकापाठोपाठ येणारी लाटा, विषाणूचा वाढता संसर्ग, घरातील कोणी ना कोणी आजारी, ऑनलाइन शिक्षणासाठी (Online Education)अनेक अडचणी, प्रवासावर कडक निर्बंध अन्‌ शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी वाहतूक सुविधा अपुरी, ऑफलाइन शाळा बहुतेक दिवस बंदच, अशा विविध अडचणींचा सामाना विद्यार्थ्यांना करावा लागला. या पार्श्‍वभूमीवर बोर्डाने प्रथमच विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला. वाहतूक सुविधा अपुरी आणि कोरोनाचा धोका टळला नसल्याने "शाळा तिथे केंद्र' असा पर्याय शोधला. 25 टक्‍के अभ्यासक्रमही कमी केला. या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण खूपच कमी झाले. दुसरीकडे कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे कॉफी प्रकरणांची पडताळणीवरीही मर्यादा आल्या आहेत. तरीही, विद्यार्थ्यांनी विशेषत: होतकरू, हुशार विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर सोडविल्यास त्यांना पुढील शिक्षणासाठी कोणत्याही अडचणींचा सामना कराव्या लागणार नाहीत. पुस्तकात अथवा कोणाच्यातरी सांगण्यावरून उत्तरे लिहून टक्‍केवारी वाढेल, परंतु त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नसेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. बोर्डाने कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी सुधार योजना लागू केली असून त्यातून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळविता येतील. तरीही, विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षेसाठी खूप वेळ असून तोवर परीक्षेची जोरदार पूर्वतयारी करावी, जेणेकरून परीक्षेत तणाव राहणार नाही.

कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेच्या माध्यमातून बोर्डाकडून फेरपरीक्षेच्या दोन संधी दिल्या जातात. आजारपणासह अन्य कारणास्तव परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसह आता होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षा होईल. जुलैअखेरीस परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे.

- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

श्रेणी सुधार योजना काय आहे?

दहावी अथवा बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा घेतली जाते. काही विद्यार्थ्यांची पूर्वतयारी झालेली नसतानाही त्यांना परीक्षा द्यावी लागते. कौटुंबिक अथवा वैयक्‍तिक कारणास्तव त्यांना चांगले गुण घेता येत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत अडथळा निर्माण होतो आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. त्या विद्यार्थ्यांना गुणांची टक्‍केवारी वाढविण्यासाठी पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या पुढील परीक्षेत पुन्हा बसण्याची संधी बोर्डाकडून उपलब्ध करून दिली जाते, अशी ही श्रेणी सुधार योजना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT