HSRP number plate Fake : बनावट एचएसआरपी नंबरप्लेट कारखान्यावर छापा, यंत्रसामग्री जप्त; एकास अटक

Kolhapur fake number plate raid : कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावात बनावट एचएसआरपी नंबरप्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक करण्यात आली.
Illegal HSRP manufacturing unit busted kolhapur

Illegal HSRP manufacturing unit busted kolhapur

esakal

Updated on

Duplicate vehicle number plate racket : बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी हातकणंगले तालुक्यातील साजणी या गावात कारवाई करत तयार ३३ नंबरप्लेट, डाय मशीन, स्टीकर, पत्रा असे साहित्य जप्त केले. या नंबरप्लेट नियमबाह्य वाहनांसाठी पाचशे ते हजार रुपयांना विकल्या जात होत्या. पोलिसांनी या प्रकरणी संतोष बबन यादव (वय ३१, रा. साजणी, हातकणंगले) याला अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com