UK government scholarships for Indian women
UK government scholarships for Indian women SAkal
एज्युकेशन जॉब्स

Scholarships for women : महिलांकरिता ब्रिटिश दुतावासातर्फे शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा

Pune News : विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून ब्रिटिश दूतावासाच्या वतीने शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

ब्रिटिश दूतावासाच्या वतीने जगभरातील महिलांसाठी ही विशेष शिष्यवृत्ती घोषित केली आहे. त्याबद्दल एज्युकेशन इंडियाच्या संचालक रित्तिका चंदा फारुख सांगतात,‘‘संशोधन आणि नवनिर्मितीत महिलांची संख्या वाढावी म्हणून ब्रिटिश दूतावासाच्या वतीने ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अधिक अर्थपूर्ण रीतीने हे योगदान असेल.’’ ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी, ग्रीनविच युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येईल. शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्क, स्टायपेंड, प्रवास खर्च, व्हिसा,

आरोग्य विमा आदींचा समावेश असेल. स्कॉलर्स डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फार्मास्युटिकल सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, इंटेलिजंट हेल्थकेअर आदी अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात. ब्रिटिश दूतावासाच्या वतीने भारत किंवा दक्षिण आशियातील विद्यार्थिनींसाठी २५ टक्के शिष्यवृत्ती राखीव असणार आहे.

देशातील विज्ञान तंत्रज्ञानात महिला

- संशोधन किंवा नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण ः २७ टक्के

- या क्षेत्रात पदवीधरांमध्ये महिलांचे प्रमाण ः ४३ टक्के

(स्रोत ः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०२३)

अधिक माहितीसाठी https://www.britishcouncil.in/study-uk/scholarships

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT