World Book Day Jayakar Knowledge Resource Centre sakal
एज्युकेशन जॉब्स

World Book Day : विद्यापीठातील पिढ्या घडविणारे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र

जागतिक पुस्तक दिन विशेष: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हटले की झपकन डोळ्यासमोरून जयकर ग्रंथालय नक्की येते. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच विविध क्षेत्रात नेतृत्त्व करणाऱ्या अनेक पिढ्यांनी या ग्रंथालयात अभ्यास केला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाचा स्त्रोत ठरलेल्या या जयकर ग्रंथालयाचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त घेतलेला हा आढावा...

यंदाचे वर्ष हे विद्यापीठाचेही अमृतमहोत्सवी वर्ष आहे. तर जयकर ग्रंथालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष हे पुढील वर्षी सुरू होणार आहे. याविषयी माहिती देताना जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र सांगतात,‘‘ग्रंथालयात विद्यापीठाच्या विविध विभागांकडून सुचविण्यात आलेल्या पुस्तकांची दरवर्षी खरेदी केली जाते.

ग्रंथालयातील संख्यात्मक साहित्य दरवर्षी वाढतेच परंतु गुणात्मक दर्जा देखील टिकविण्याचा आमचा प्रयत्न असतो. या केंद्रात दुर्मिळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत.

त्यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ई शोधसिंधू या योजनेमार्फत देखील २००४ सालापासून १४ ई जर्नल उपलब्ध करून दिली जातात.’’ ग्रंथालयाबरोबरच विद्यार्थी पाच मजली अभ्यासिकेचा लाभ घेतात. यात जवळपास एकूण हजार विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय करण्यात आली आहे.

जयकर ग्रंथालयाचा प्रवास...

- विद्यापीठाची स्थापना १९४९ मध्ये झाल्यानंतर लगेचच १९५० मध्ये मुख्य इमारतीत ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली.

- १९५७ मध्ये ग्रंथालयाला स्वतंत्र इमारत मिळाली व ग्रंथालयाला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर एम.आर जयकर यांचे नाव देण्यात आले.

- २०१७ साली जयकर ग्रंथालयाचे नाव जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र करण्यात आले.

- आजमितीला ४ लाख ७७ हजार ग्रंथांचा संग्रह केंद्रात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT