Bhagwanth Khuba sakal
Maharashtra Election 2024 Result

Marathwada Assembly Election : विकासाचा डोंगर उभारणाऱ्या संजय बनसोडे यांना विजयी करा : भगवंत खुब्बा

विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करून पाच वर्षात उदगीर मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवुन जाण्याचे काम राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे. त्यामुळे विकासाठी झटणाऱ्या बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले.

युवराज धोतरे

उदगीर, (जि.लातुर) : विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करून पाच वर्षात उदगीर मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवुन जाण्याचे काम राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे. विकासाचा हा डोंगर उभा करून या भागातील सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले.

उदगीर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ येथील उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेह सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपाचे निवडणूक प्रभारी हरीश कोटवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. व्यंकट बेद्रे, माजी उपसभापती रामराव बिरादार, प्रदेश सरचिटणीस समीर शेख, अॅड. बस्वराज पाटील कौळखेडकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, सुधीर भोसले, उत्तरा कलबुर्गे, श्रध्दा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, बिरादार, महाराष्ट्र बसव परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल बागबंदे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खुबा म्हणाले, उदगीर मतदार संघात संजय बनसोडे हे मंत्री झाल्यापासून मोठा बदल झाल्याचे पहावयास मिळत आहे. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन निघालेले बनसोडे यांनी मागच्या पाच वर्षात मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी म्हणून कोल्हापुरी बंधारे व तिरू नदीवर बॅरेजची उभारणी करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने अल्पदरामध्ये पिक विमा शेतकऱ्यांची वीज बिल यासह विविध कल्याणकारी योजना राबवले आहेत.विविध प्रशासकीय इमारतीसह रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न सोडवले असुन सर्व जाती धर्मातील समाज घटकांना न्याय दिला आहे.

लिंगायत समाजाला वीरशैव लिंगायत भवन, चौकी मठाला निधी, श्री रेणुकाचार्य संस्कार भवनाला निधी उपलब्ध करुन दिला. श्री हावगीस्वामी मठाचा विकास केला.जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विकास करणारे हे नेतृत्व असून अशा नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांकडून आपल्या समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला बळी न पडता सर्वांनी विकासासाठी एकदिलाने ना.संजय बनसोडे यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांनी केले.यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#ElectionWithSaka

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT