Dilip Khedkar: गेल्या तीन ते चार महिन्यांपासून राज्यासह देशभरात चर्चेत असलेली निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांनी आता येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून विधानसभेसाठी नशीब आजमावणार आहेत.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिलीप खेडकर यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापीतांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढववणार आहे.
प्रशिक्षण काळात बेकायदेशीर मागण्या केल्यामुळे पूजा खेडकर वादात सापडली होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी खेडकर विरोधात तक्रार दाखल केली होती. वाद वाढल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने पूजा खेडकरवर कारवाई करून तिच्या प्रशिक्षणावर बंदी घातली आणि पूजा खेडकरला फील्ड पोस्टिंगवरून काढून टाकण्यात आले होते.
मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये पूजा खेडकरला सर्व प्रकरणाबाबत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. पण दिलेल्या मुदतीत पूजा खेडकरने याची माहिती दिली नाही.
पुढे युपीएससीने खेडकरला इथून पुढे कोणत्याही परीक्षेला बसण्यास बंदी घातली होती. दरम्यान याला पूजा खेडकरने न्यायालयात आव्हान दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.