
पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. पुण्याच्या बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीहून इंदापूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका तरुणाने विळा काढून बसच्या मागे बसलेल्या तरुणावर हल्ला केला. यादरम्यान मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीला अटक केली. या हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.