Sanjay Pandey Maharashtra Assembly Election 2024 Esakal
Maharashtra Election 2024 Result

Sanjay Panday: गोपीनाथ मुंडेंना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची राजकारणात एन्ट्री! विधानसभेसाठी जाहीर केला मतदारसंघ अन् पक्ष

Maharashtra Assembly Election 2024: कथित फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना सीबीआयने सप्टेंबर 2022 मध्ये अटक केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

आशुतोष मसगौंडे

राज्यात दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. अशात राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असून, सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जास्त जागा पदरात पाडूण घेण्यासाठी आतापासूनच चढओढ सुरू झाली आहे. तर राज्यातील काही छोटे पक्ष तिसरी आघाडी स्थापन करत निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.

अशात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

मतदारसंघ

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी नुकतेच मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ही निवडणूक ते अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माजी डीजीपी पांडे म्हणाले की, "मी सक्रिय राजकारणात येण्याचा बराच काळ विचार करत होतो, परंतु यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे."

यासोबतच ते म्हणाले, "आतापर्यंत मी गेली अनेक वर्षे ज्या मतदारसंघाl राहत आहे, त्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, सर्व स्तरातून मिळत असलेल्या पाठिंब्याचे मी स्वागत करतो."

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पांडे 2022 मध्ये निवृत्त झाले होते. IIT कानपूरमधून पदवी मिळवलेल्या पांडे यांनी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी म्हणून विविध पदांवर काम केले आहे.

गोपीनाथ मुंडे अटक प्रकरण

मुंबई पोलीस आयुक्तालय झोन 8 चे पोलीस उपायुक्त असताना पांडे हे 1992-93 च्या जातीय दंगलीनंतर संवेदनशील धारावी परिसराची जबाबदारी सांभाळत होते. तेथील कार्यकाळात त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखली.

धारावीत या कार्यकाळात पांडे यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना धारावी पोलिस ठाण्यात अटक केली होती. पांडे हे नंतर डीसीपी ईओडब्ल्यू होते आणि तेथे तैनात असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या मोची घोटाळ्याची चौकशी केली. नंतर पांडे यांची जालन्यात बदली झाली आणि त्यावेळी गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते.

कथित फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना सीबीआयने सप्टेंबर 2022 मध्ये अटक केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

संजय पांडे निवडणूक लढवण्याची घोषणा करताना पुढे सांगितले की, "आपण आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधलेला नाही. मी स्वत:ची राजकीय संघटना स्थापन करणार असून, तिच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT