Save the feet from diabetes
Save the feet from diabetes 
फॅमिली डॉक्टर

मधुमेहींनो, पाय वाचवा! 

- डॉ. मनीषा देशमुख

मधुमेह म्हटल्यावर कोणकोणत्या अवयवांवर परिणाम होतील याची एक यादी वाचली जाते. त्यासंबंधी काळजी घ्यायलाही सांगितले जाते. पण मधुमेहींनी पायाची काळजी घेणे अधिक गरजेचे असते. आपल्याच पायांवर आयुष्यभर उभे राहायचे असेल तर मधुमेहींनी स्वतःचे पाय वाचवले पाहिजेत. 

भारतात आज असा माणूस शोधूनही सापडणार नाही, त्याच्या ओळखीत कोणाला मधुमेह नाही. 

अगदी तीस वर्षांपूर्वी फक्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच मधुमेही रुग्णांसाठी फक्त बाह्यरुग्ण सेवा असायची. पण, आता चित्र पूर्ण बदलले आहे. आज गल्लोगल्ली मधुमेहतज्ज्ञ आणि मधुमेह क्‍लिनिक्‍स सापडतात. या भयंकर आजाराची व्याप्तीच तेवढी वाढली आहे. 

मधुमेहामुळे लगेच काहीच त्रास होत नसला तरी, कालांतराने सर्व अवयवांवर याचा वाईट परिणाम होतो आणि ते आटोक्‍यात आणणे अत्यंत कठीण असते, याबद्दल शंका नको. हृदय, मूत्रपिंड, डोळे इत्यादींबाबत बरेच बोलले आणि लिहिले जाते. पण, मधुमेहींच्या पायांवरसुद्धा तेवढाच वाईट परिणाम होत असतो. याबद्दल फारशी माहिती पुरवली जात नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत पायांवर मधुमेहामुळे होणारे बदल किंवा दुष्परिणामाबाबत डॉक्‍टरांमध्येसुद्धा आता एवढी जागरूकता नव्हती. पण, जेव्हा काही पाश्‍चिमात्य देशांमध्ये ‘पाय कापलेल्या’ रुग्णांची आकडेवारी व कारणांची कारणमीमांसा झाली, तेव्हा असे आढळून आले, की सर्वांत जास्त पाय कापलेल्या लोकांना मधुमेहसुद्धा आहे. लगेचच याबद्दल तिथे संशोधन सुरू झाले नसते तरच नवल! काही असे घटक किंवा कारणे आहेत काय ज्यांच्यामुळे मधुमेही व्यक्ती सामान्य माणसापेक्षा पाय कापण्याला जास्त प्रमाणात बळी पडतात, हा विचार या अभ्यासामागे होता. आणि मग एका पाठोपाठ एक अशा प्रकारचे शोधनिबंध सर्व जगातून यायला सुरवात झाली. 

मधुमेहींच्या पायाबद्दल ज्याला आपण ‘डायबिटिक फूट’ असेही म्हणतो, जसजशी माहिती पुढे यायला लागली तसे, ते आकडे बघून सर्वांचेच डोळे विस्फारले. 
आता हेच बघा ः 

- जवळजवळ पंचवीस टक्के मधुमेहींना त्यांच्या आयुष्यात न भरणारी जखम होण्याची शक्‍यता असते. 

- दर वीस सेकंदाला एका मधुमेही रुग्णाचा पाय कापला जातो. 

- पाय कापल्यानंतर एका मधुमेहीचे आयुष्यमान कमी होते. 

- डायबिटिक फूटचे आर्थिक पडसाद तर अत्यंत बिकट आहेत. एका मधुमेहीला जखम भरण्यासाठी पन्नास हजार ते दोन-तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. कधी कधी त्याहूनही जास्त. 

- सर्व जगात जास्तीत जास्त वेळा मधुमेही रुग्ण पायांच्या त्रासांसाठी सर्वांत जास्त दिवस रुग्णालयात भरती राहतात. त्यामुळे त्यांचे कामाचे बरेच दिवस वाया जातात. 

- याचबरोबर हेही लक्षात आले, की 85 टक्के पाय कापण्याचे कारण एक लहान, किरकोळ, दुर्लक्षित राहिलेली जखम आहे. 

 

आमच्या फूटक्‍लिनिकमध्ये सुरू असणाऱ्या संशोधनात बरेच नवीन मुद्दे आढळून येत आहेत. हे सर्व शोध लागल्यानंतर हे प्रमाण कसे कमी करता येईल यावर सर्वांचा अर्थातच अभ्यास सुरू झाला आणि त्यातून असे निष्पन्न झाले, की मधुमेहींमध्ये पाय कापण्याचे प्रमाण कमी करावयाचेच असेल तर काही धोक्‍याच्या पूर्वसूचना लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच किरकोळ वाटणाऱ्या जखमांची काळजी कशी घ्यायची याबद्दल डॉक्‍टर व रुग्णांमध्ये पुरेशी जागरूकता निर्माण केली पाहिजे. 

महत्त्वाचे म्हणजे असे शक्‍य आहे, हे पाश्‍चिमात्य देशांमध्ये आता सिद्ध झाले आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मधुमेही पायांच्या आजारांवर होणारा खर्च व वाया जाणारे कामाचे तास अजिबात परवडणारे नाही. 

हे सर्व डोळ्यांसमोर ठेवून 2004 मध्ये डॉक्‍टरांसाठी भारतात ‘स्टेप बाय स्टेप’ हा ‘जागतिक मधुमेह संघटने’च्या वतीने प्रकल्प राबविण्यात आला. यात भारतात शंभर फिजिशियन्सची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आणि त्यातल्या दहा जणांना या विषयाचे अद्ययावत ज्ञान संपादन करण्यासाठी जर्मनीला पाठविण्यात आले. (त्या दहा जणांमध्ये माझापण समावेश आहे, हे सांगताना आनंद वाटतो.) कुठल्याही आपत्तीवर बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घालणे शक्‍य आहे. परंतु, त्यांची तयारी प्रत्यक्ष आपदा येण्याच्या बऱ्याच पूर्वीपासून करावी लागते. आमच्या शहरात, घरात पूर कधीच येणार नाही अशी गोड गैरसमजूत ठेवून त्याबद्दल कुठलीच पूर्वतयारी नसल्यामुळे काय विध्वंस होऊ शकतो, ते आपण पाहिलेच आहे. पण, हे सगळे टाळता आले असते काय, हा विचार महत्त्वाचा आहे. 

शेवटपर्यंत स्वतःच्या पायांवर उभे राहायचे असेल तर, त्याबद्दल काही पूर्वतयारी अत्यावश्‍यक आहे. त्याची सुरवात कुठून व्हावी, तर सर्व मधुमेहींनी आपल्या पायांची धोक्‍याची पातळी जाणून घेणे आवश्‍यक आहे. वेळोवेळी या बाबतीत सामान्य जनतेचे प्रबोधन करण्याचा माझा मनापासून प्रयत्न आहे. या विषयात काम करण्यासाठी अत्यंत चिकाटी व विषयाबद्दल जिव्हाळा लागतो. कारण, हे सर्व आजवर अत्यंत किचकट आणि त्रासदायक असतात. मग ते पायांची साधी वाटणारी जळजळ असो किंवा न भरणारी दुर्धर जखम. 

वेगवेगळ्या अभ्यासांनंतर हे सिद्ध झाले आहे, की एक ‘पद्धतशीर रणनीती’ (effective care plan) आखून त्यावर निरंतर काम केल्यास यावर मात करता येते. तसे केल्यास पाय कापण्याचे प्रमाण 85 टक्‍क्‍यांनी कमी करता येणे शक्‍य आहे. पण, दुर्दैवाने डॉक्‍टरांमध्येच पुरेशी माहिती नसणे, वेळीच फूट स्पेशालिस्टकडे न पोचणे, तसेच प्रत्येक ठिकाणी फूट केअर क्‍लिनिक्‍सचा अभाव, ही त्रास आटोक्‍यात न येण्याची प्रमुख कारणे आहेत. 

प्रत्येक मधुमेही रुग्णाचा पाय हा ‘डायबिटिक फूट’ या प्रकारात मोडतो. फक्त प्रत्येकाची धोक्‍याची पातळी वेगवेगळी असते एवढेच. 
परंतु, कुठल्याही पातळीवर असल्यास यशस्वी उपचारासाठी काही महत्त्वाचे घटक अत्यंत गरजेचे आहेत. ते असे आहेत - 
- माफक शर्करा नियंत्रण. 
- माफक व योग्य प्रकारे जखमेची काळजी. 
- जंतुसंसर्गावर अचूक व वेळीच उपचार. 
- जखमांवर दाब येणार नाही यासाठी उपाययोजना. 
- पायांचा रक्तपुरवठा कमी असल्यास तो वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न. 
- जखम न होऊ देण्याबद्दल जागरूकता व पायांची काळजी घेण्याबाबत कटिबद्धता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT