पालक (Spinach) सूप प्यायल्याने होमोग्लोबिन वाढते. esakal
फूड

पालक सूप प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढते; जाणून घ्या रेसिपी

पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह (iron) असते, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन (haemoglobin) वाढण्यास मदत होते.

सकाळ डिजिटल टीम

हिरव्या पालेभाज्यांमधील (Leafy vegetables) एक महत्त्वाची भाजी म्हणजे पालक (Spinach). आजकाल बाजारात पालक सहजतेने उपलब्ध होते. चवीला थोडी कडवट असली, तरी ती आरोग्यासाठी ती खूपच फायदेशीर असते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह (iron) असते, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन (haemoglobin) वाढण्यास मदत होते. शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर तज्ञ पालक खाण्याचा सल्ला देखील देतात. पालकची भाजी तसेच भजी किंवा इतर पदार्थ तुम्ही खाल्ले असतील, पण पालकच्या सूपबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. म्हणूनच पालक सूप कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत.

पालक सूपसाठी लागणारं साहित्य-

पालक, मीठ, आले, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबाचा रस, काळी मिरी, मलई.

पालक सूप कसं बनवायचे (how to make Spinach soup?)-

पालक सूप बनवण्यासाठी प्रथम पालक स्वच्छ करून घ्या. साफ केल्यानंतर कापून घ्या. आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात पालक, टोमॅटो आणि आले उकळून घ्या. उकळल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली पेस्ट बनवा. आता दुसऱ्या भांड्यात दोन कप पाणी गरम करून त्यात ही तयार पेस्ट टाका आणि थोडा वेळ शिजवा. नंतर त्यासोबत इतर साहित्य टाकून एक ते दोन मिनिटे शिजवून घ्या आणि नंतर गॅस बंद करा. झाले तुमचं पालक सूप तयार. आता या पालक सूपवर मलई टाकून सर्व्ह करा.

पालकचे इतर फायदे-

शरीराला कार्य व्यवस्थित चालावं यासाठी विविध प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. अशा परिस्थितीत पालक आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि कॅन्सरविरोधी घटकांनी समृद्ध असलेली ही हिरवी भाजी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. पालक ही लोह , जीवनसत्त्वे (vitamin) आणि खनिजांनी (minerals)समृद्ध असलेली पालेभाजी आहे, जी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पालक खाण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे त्यात कॅलरी आणि फॅट कमी असते. पालकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते अपचन (Indigestion) , बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या टाळण्यास मदत करते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होते. पालक खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

Nashik News : 'नो पार्किंग'चे फलक फक्त शोभेचे! सिडकोमध्ये वाहने सर्रास थांबवली जातात

Wani News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू; मुलाचा आरोग्य केंद्रात आत्मदहनाचा प्रयत्न

Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादन कामाला मिळणार गती; कात्रजमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण, कोंढव्यातील काम सुरु

SCROLL FOR NEXT