फूड

शिल्लक ताकापासून बनवा 'हे' चविष्ट पदार्थ

स्नेहल कदम

कोल्हापूर : गरमीच्या दिवसांत ताक पिणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. यामध्ये असणाऱ्या कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आहारामध्ये याचा समावेश करतात. ताज्या दहीपासून बनवलेले ताक हे अधिक लाभदायक असते. दोन-तीन दिवसांसाठी याला तसेच ठेवल्यास ते आंबट होते. त्यामुळे तुम्ही शिल्लक राहिलेल्या ताकाचा वापर करून अनेक नवीन पदार्थ तयार करू शकता. काही लोक फ्रीजमध्ये ठेवलेले ताक विसरून जातात. काही दिवसानंतर ते खराब होते. त्यामुळे अशा खूप साऱ्या रेसिपीजमध्ये तुम्ही ताकाचा वापर करू शकता. त्या रेसिपीज आज आपण पाहणार आहोत...

क्रिमी सलाड

काही दिवसांसाठी ताक तसेच ठेवल्यास त्या आंबट होते. त्यामुळे याचा वापर तुम्ही सलाडच्या गार्निशिंगसाठी करू शकता. त्यासाठी शिल्लक राहिलेल्या ताकामध्ये सलाड मिक्स करा आणि त्याच्यावर कोथिंबीर पसरवा. सोबतच काळी मिरची पावडर मिक्स करा. शेवटी चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण हलवून घ्या. खाण्यासाठी तयार आहे टेस्टी सलाड. शिवाय तुमच्या आरोग्यासाठीही हे लाभदायक असेल.

मोर्निंग टेस्टी स्मूदी

वजन कमी करण्यासाठी बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये फळ किंवा पालक स्मुदी पिण्यास पसंती देतात. तुम्ही अशा वेळी दहीच्या जागी ताकाचा उपयोग करू शकता. यासाठी सर्व फळांना आणि ताकाला मिक्सरमध्ये बारीक करून चवीनुसार मीठ टाकून सोबत थोडासा गूळ टाकल्यास तुम्ही एक उत्तम स्मुदी बनवू शकता.

सूप बनवण्यासाठी उपयोग

अनेक प्रकारचे सूप बनवण्यासाठी ताकाचा वापर केला जातो. मक्यापासून बनवले जाणारे सुपमध्ये ताकाचा वापर होतो. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या मक्याच्या पिठात तुम्ही ताक मिसळून त्यातील गाठी फोडून घ्या. यामध्ये एक ते दोन वाटी पाणी मिक्स करा. या मिश्रणामध्ये पाणी घालून थोडं गरम करून घ्या. दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्या. यानंतर तुमचे सूप तयार होईल. तसेच तुम्ही याला जीरे आणि हिंग घालून फोडणी देऊ शकता. आणि चवीनुसार मीठ टाकू शकता.

ग्रेव्हीसाठी ताकाचा उपयोग

नॉनव्हेज पदार्थ बनवण्यात ग्रेव्हीवर जास्त भर द्यावा लागतो. कारण ग्रेव्ही ही तर त्या डिशचे रौनक वाढवते. काही लोक ग्रॅव्ही सुखी किंवा स्वादिष्ट बनवण्यासाठी ताकाचा उपयोग करतात. कारण यामध्ये क्रीम जास्त असते. यासाठी दुधाऐवजी ताकाचा वापर केल्यास नॉनव्हेज डीश अधिक स्वादिष्ट होते. तशीच ती हेल्दी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT