CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

हे तीन घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात
CCF Tea For Thyroid
CCF Tea For Thyroidesakal

CCF Tea For Thyroid :

भारतीय मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर असतात. त्यामुळेच आपल्या आहारात सगळ्या मसाल्यांचा पुरेपूर वापर केला जातो. आपल्या स्वयंपाकघरात असलेला मसाला आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्याच्या अनेक समस्या सोडवण्यातही तो आपल्याला मदत करतो.

जेव्हा स्वयंपाकघरातील मसाले आणि आरोग्य यावर चर्चा केली जाते. तेव्हा हळदीबद्दल जास्त बोललं जातं. पण, डब्यात असलेले अनेक पदार्थ आहेत जे तुम्हाला गंभीर समस्यांमध्येही गुणकारी फायदे देतात. आज आपण जिरे, धणे आणि बडिशेपबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचे थायरॉईडमध्ये अनेक फायदे आहेत. (CCF Tea Cumin, Coriander, Fennel)

CCF Tea For Thyroid
थायरॉईड आणि तुमचे आरोग्य

आहारात बडिशेप, जिरे आणि धणे खाण्याचे फायदे

  • - हे आंतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते

  • - त्वचेशी संबंधित समस्या दूर ठेवू शकते

  • - हा चहा मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे

  • - शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो.

  • - हे तीन घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात

CCF Tea For Thyroid
Thyroid : थायरॉइड फंक्शन सुरळीत करण्यास या १० गोष्टी करतील मदत, आवर्जून फॉलो करा हे डेली रूटीन

थायरॉईडवर कसा काम करतो हा चहा

हायपर थायरॉईडच्या बाबतीत थायरॉईड संप्रेरक (T3 आणि T4) सीरमची पातळी कमी करण्यासाठी मदत होते.

बडीशेप जास्त प्रमाणात सेवन केल्याने हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होण्यास मदत होते.  

CCF Tea For Thyroid
Thyroid Awareness Month 2024 : थायरॉइडवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील ‘हे’ पदार्थ, आजच करा आहारात समावेश

हा चहा कसा बनवायचा?

जिरे, धणे आणि बडीशेप प्रत्येकी अर्धा चमचा घ्या. सर्व साहित्य २ कप पाण्यात उकळून ते अर्धे करावे. हा चहा तुमचा मूड फ्रेश करेल. हवे असेल तर त्यामध्ये तुम्ही मधही घालू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com