Monsoon Special Evening Snack | Matar Pakode sakal
फूड

Matar Pakoda Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील Monsoon Special मटार पकोडे; आजच ट्राय करा!

Best evening snacks for rainy season: पावसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे मटार पकोडे आजच बनवा – कुरकुरीत चविष्ट टी टाइम स्नॅक!

Anushka Tapshalkar

How to Make Crispy Matar Pakoda at Home: पावसाळ्यात गरमागरम आणि घरगुती चव असलेले खाणं खास वाटतं. अशा वेळी मटार पकोडे ही एक सोपी आणि चविष्ट रेसिपी ठरते. मटार, बटाटा आणि काही सोप्या साहित्याने तयार होणारे हे पकोडे चहासोबत खायला अगदी योग्य आहेत. संध्याकाळच्या स्नॅकसाठी तर हा उत्तम पर्याय ठरतो. चला तर मग रेसिपी समजू घेऊया.

साहित्य

मटाराचे दाणे अर्धा किलो, दोन बटाटे, एक मोठा चमचा बेसन, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक इंचाचा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ.

कृती

1. मटार धुऊन व उकडून घ्या.

2. बटाटे उकडून घेऊन स्मॅश करा.

3. उकडलेले मटार मिक्‍सरमधून वाटून घ्या.

4. एका कुंड्यात बेसन, वाटलेले आले-मिरची, स्मॅश केलेला बटाटा वाटलेल्या मटारमध्ये मिक्‍स करा आणि मिश्रण चांगले मळून घ्या.

5. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून लिंबाएवढे गोळे करा.

6. कढईत तेल चांगले तापल्यावर त्यात हे गोळे मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या.

7. हे गरमागरम पकोडे टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

8. हे पकोडे कढीमध्ये घालून खाल्ल्यासही छान लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT