फूड

Fitness Freak Faral : बिनधास्त मारा फराळावर ताव, वजन नाही वाढणार राव!

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी हा असा काळ असतो जेव्हा तुमच्या डाएट प्लॅनची आणि व्यायामाची खरी कसौटी असते. वर्षभर आतुरतेने वाट पाहिल्यानंतर हा सण येतो त्यामुळे तुम्ही स्वत:लाच थोडी सुट देता आणि कुटंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणींसोबत दिवाळीतील फराळ आणि मिठाईचा आस्वाद घेता. यात तुमची चूकी नाही दिवाळी तयार केले जाणारे पदार्थ हे इतके चविष्ठ असतात की कोणीही मनसोक्त खाल्याशिवाय राहूच शकत नाही.

भारतामध्ये दिवाळी हा सण कुटंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणींसोबत मौज-मज्जा करत फराळ आणि मिठाई शिवाय होऊच शकत नाही. पण हे कितीही पदार्थ चविष्ट असले आणि मिठाई कितीही गोड असली तरी एकदा का दिवाळी संपली मग तुम्हाला समजते तुमचे वजन वाढले आहे. नंतर कितीही पश्चाताप केला तरी काही फायदा होत नाही. दिवाळी वर्षातून एकदाच येते आणि ती साजरी करताना दिवाळीचा फराळा आणि मिठाईवर ताव मारणे यात काहीही चुकीचे नाही. पण तुम्हाला नंतर वजन वाढवायचे नसेल किंवा तुमचा डाएट प्लॅन फसला किंवा व्यायाम-करसत वाया गेली असे वाटू नये असे वाटत असेल तुमच्यासाठी आमच्याकडे एक उपाय आहे. तुम्ही दिवाळीच्या फराळाचा आनंदही लुटू शकता आणि तुमचे वजनही वाढणार नाही. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. हे शक्य आहे फिटनेस फ्रिक फराळामुळे. तुम्ही या दिवाळीमध्ये हेल्दी फराळ आणि मिठाई बनवू शकता. दिवाळीच्या पदार्थामध्ये काही पदार्थ असेही आहेत जे तुम्हाला हेल्दी राहण्यास मदत करतील आणि तुमचा डाएट देखील फसणार नाही.

दिवाळी फराळ (Snacks) आणि मिठाई (Sweets)

बिनधास्त खा हेल्दी आणि आवडीचा फराळ-मिठाई, साजरी करा गिल्ट फ्री दिवाळी. तुम्हाला अजुनही विश्वास बसत नसेल तरी हेल्दी ते सुध्दा दिवाळीचा फराळ आणि मिठाई? हे कस काय शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहेत हे पदार्थ

Kaju Katli

काजू कतली ( Kaju Katli_)

भारतीय मिठाईपैकी सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे काजू कतली. गिफ्ट म्हणूनही काजू कतली देतात. दुकानातून आणलेली काजू कतली खाण्यापेक्षा खरच्या घरीच तुम्ही हेल्दी काजू कतली तयार करू शकता. ही काजू कतली हेल्दी बनविणारा सिक्रेट पदार्थ आहे मध. तुम्ही सारखे ऐवजी मध वापरा.

baked chakli

बेकड् चकली (baked chakli)

चकली हा असा पदार्थ आहे जो दिवाळीमध्ये हमखास बनवितात. त्यामुळे दिवाळीतील चविष्ट पदार्थांच्या यादीमध्ये पदार्थ ठरलेला आहे. तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तळलेली चकली खाणे टाळा पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवाळीमध्ये चकली खाऊ नका. चकली खा पण तळलेली नाही बेकड् चकली खा. तुम्ही चकली बेक करून तिला हेल्दी बनवू शकता. तुम्ही नेहमी चकलीचा आस्वाद घेऊ शकता आणि आरोग्यही जपू शका.

Dry Frouits Laddoo

ड्राय फ्रुट लाडू (Dry Frouits Laddoo)

तुम्हाला जर ड्राय फुट खायला आवडत असेल तर तुम्हाला ड्रायफ्रुट्चे लाडू देखील आवडतील. तुप आणि साखरेच्या पाकात मुरलेल्या इतर लाडूंपेक्षा हे लाडू जास्त पौष्टिक असतात. तुम्हाला जर दिवाळीमध्ये शुगर फ्री स्विट हवे असतील तर ड्राय फ्रुट लाडू ट्राय करू शकता.

Roasted Poha Chivda

रोस्टेड पोहा चिवडा (Roasted Poha Chivda)

दिवाळीमध्ये प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पोहा चिवडा. हा अगदी कमी तेलात तयार होणारा आणि भूक भागविणारा पदार्थ आहे त्यामुळे तुमचा डाएट प्लॅन मोडणार नाही. हा हेल्दी पदार्थ आहे त्यामुळे या दिवाळीमध्ये रोस्टेड पोहा चिवडा खा आणि दिवाळीचा आनंद लुटा

Baked Shankarpale

बेकड् शंकरपाळ्या (Baked Shankarpale)

शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दक्षिण भारतात जवळपास सर्व घरांमध्ये भरणीमध्ये भरून ठेवलेला आढळतो. हा पदार्थ दिवाळी आणि होळीला तयार करतात. पांरपारिक पध्दतीनुसार हा पदार्थ मैदा वापरून आणि तुपामध्ये तळून करुन केला जातो, पण आम्ही तुम्हाला तुमच्या गोड आणि कुरकरीत पदार्थासाठी हेल्दी पर्याय सुचविणार आहोत. तुम्ही गव्हाच्या पिठापासून बेक केलेल्या शंकरपाळ्या बनवा. तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठामध्ये मिठ आणि मसाले टाकून तिखट किंवा खारे शंकरपाळे बनवू शकता.

Coconut Ladoos

नारळाचे लाडू (Coconut Ladoos)

नारळापासून तयार केलेले लाडू दक्षिण भारतातील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. कोकणातील काही प्रदेशातही हा लाडू आवडीने खाल्ला जातो. दिवाळी आणि गोड पदार्थांची खमंग मेजवानी हे सुत्र वेगळं आहे. या दिवाळीत काही वेगळे करून पाहायचे असल्यास तुम्ही ही लाडूची रेसिपी ट्राय करु शकता. अगदी घरी असलेल्या वस्तूंमधून तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. ताजे किसलेले खोबरे वापरावे, गुळ असे साहित्य वापरून तुम्ही ही खोबऱ्याचे लाडू बनवू शकता. ते अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी तुम्ही साखरे ऐवजी गूळही वापरू शकता.

Whole Wheat Papdi

गव्हाची चटपटीत पापडी (Whole Wheat Papdi)

गव्हाच्या पिठाची पापडी हा देखील दिवाळीमधील हेल्दी पदार्थ आहे. तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर हा पदार्थ खाऊ शकता. तुम्ही गव्हाच्या पापडी आणखी हेल्दी बनिवण्यासाठी बेक करू शकता.

Whole Wheat Nankatai

गव्हाची खमंग नानकटाई (Whole Wheat Nankatai)

नानकटाई हा सहसा मैद्यापासून बनवला जाणारा पदार्थ आहे पण, तुम्हाला नानकटाईला हेल्दी बनवायचे असेल तर तुम्ही गव्हाचे पीठ वापरू शकता. तुम्ही त्यामध्ये गोडीसाठी थोडी साखर टाकू शकता. पण काळजी करू नका तुम्ही केव्हाही 10 मिनिटांचा वॉक घेऊन ही जास्तीची कॅलरीज बर्न करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT