फूड

मृग नक्षत्राला खाल्ली जाणारी शेवग्याची भाजी; जाणून घ्या रेसिपी

स्नेहल कदम

कोल्हापूर : जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमण झाले की, शेतीकामांना जोर धरला जातो. यावेळी मृग नक्षत्राची सुरुवात होते. दरम्यान या नक्षत्राला शेवग्याची भाजी खाल्ली जाते. ग्रामीण (villege and city people) शहरी भागात शेवगा ही सहज मिळणारी भाजी आहे. (drumstick vegetable recipes) तिचे औषधी गुणधर्मही आहेत. पावसाळ्यात अनेक रानभाज्या, पालेभाज्या (vegetables) येतात. यातील प्रत्येक भाजीचे विशेष गुणवैशिष्ट्ये आहेत. या रानभाज्यांची भाजी अत्यंत चविष्ट आणि पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत गुणकारी आणि औषधी असते. (how to cook drumstick vegetable recipes easy steps)

या दिवासांत शेवग्याची भाजी खाणे चांगले असते असे मानले जाते. शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजन मिळते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पीट्रिगोस्पेरमिन नावाचे कार्यकारी तत्व शेवग्याच्या पानात आढळते. हे जीवाणू प्रतिबंधक म्हणून काम करते. आंतड्यातील व्रण भरून येण्यासही या भाजीची मदत होते. ठिसूळ झालेली हाडे, वाढलेले वजन, आळस अशी लक्षणे दिसत असल्यास शेवग्याची भाजी खावी असा सल्ला दिला जातो. शारिरीक आणि मानसिक थकवा, जडपणा कमी करयचा असल्यास शेवगा खाणे उत्तम पर्याय आहे. शिवाय शेवग्याचा पाला रक्तवर्धक व हाडांना बळकटी देणारा आहे. गुणकारी असणाऱ्या शेवग्याची भाजी ही मृग नक्षत्राच्या सुरुवातीला खाल्ली जाते. या भाजीची रेसिपी ही अगदी सोपी आहे. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून तुम्ही ही भाजी तयार करू शकता.

कशी बनवावी शेवग्याची भाजी

साहित्य -

  • शेवग्याची खुडलेली पाने २ कप

  • लसुण ५ ते ६ पाकळ्या

  • बारीक चिरलेला कांदा ४

  • भिजवलेली तूरडाळ अंदाजानुसार

  • शेंगदाण्याचा कूट ४ चमचे

  • आवश्यकतेनुसार मीठ, जिरे

  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या २

कृती -

कोवळी शेवग्याची पाने खुडून घ्यावीत. ही पाने स्वच्छ धुऊन, निथळून घ्यावी. नंतर खुडलेली पाने चिरून घ्यावीत. तूर डाळ एक तास आधी भिजत ठेवावी. नंतर निथळून घ्यावी. कढईत तेल टाकावे. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र वाटून घेऊन त्याची फोडणी द्यावी. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो भाजू द्यावा. वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतून घेतल्यावर त्यात तूर डाळ घालावी. आणि पुन्हा हे मिश्रण परतवून घ्यावे. परतल्यानंतर त्यात शेवग्याची भाजी घालावी. आणि दाण्यांचा कूट, थोडं लाल तिखट घालावे. मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यावी. शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो मात्र भाजी केल्यानंतर तो खूप चविष्ट लागतो. शेवग्याच्या पानाच्या तुम्ही विविध रेसिपीही बनवू शकता. सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ बनवले जाते. शिवाय शेवग्याच्या शेगांपासून पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT