tea tea
फूड

International Tea Day: ...म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिवस, जाणून घ्या

चहाचे उत्पादन करणारे देश आज चहा दिवस साजरा करत आहेत

सकाळ डिजिटल टीम

जगभरात (World) चहाचे (Tea) उत्पादन करणारे देश आज १५ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करत आहेत, पण, भारताच्या शिफारशीवरून संयुक्त राष्ट्राने (UN) २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केला आहे. मिलान येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटनेने ( एफएओ) आंतरसरकारी गटाच्या बैठकीत भारताने हा प्रस्ताव मांडला होता.

संयुक्त राष्ट्र महासभेने चहाच्या औषधी गुणधर्मासोबतच सांकृतिक महत्व मान्य केले आहे. १५ डिसेंबर २००५ साली आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची सुरूवात नवी दिल्ली येथे झाली होती. त्यानंतर हा दिवस श्रीलंकेत साजरा केला गेला.तिथून तो जगभरात साजरा केला जाऊ लागला.

Tea

ग्रामीण अर्थव्यवस्थेतील चहाच्या योगदाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी भारताने दिलेल्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. युएनच्या मते, २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केल्याने त्याचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी मदत मिळेल. ही मदत ग्रामीण भागातील भूक आणि गरिबीशी लढण्यासीठी महत्वाची ठरेल.

संयुक्त राष्ट्राने त्यांचे सदस्य असलेल्या सर्व देश, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्याचे आवाहन केले. भारत, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, टांझानिया व्यतिरिक्त इतर अनेक देश १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करत आहेत. पण, मे महिना हा चहा उत्पादनासाठी सर्वोकृष्ट महिना मानला गेल्याने युएन ने निवडला आहे.

green tea

उत्पादन वाढविण्यावर भर

दरम्यान, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारतात काळ्या चहाचे उत्पादन 2027 पर्यंत 16.1 दशलक्ष टन होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, 2017 मध्ये ते 12.6 दशलक्ष टन होते. त्याच वेळी, तर, जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या चीनमध्ये 'ग्रीन टी'चे उत्पादन 2017 मध्ये 15.2 दशलक्ष टनांवरून 2027 पर्यंत 33.1 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Cancer Symptoms : खळबळजनक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांमध्ये आढळली 'कॅन्सर'सारखी लक्षणे

कपिल शर्माही खलिस्तानींच्या निशाण्यावर; दोन दिवसांपूर्वी उघडलेल्या कॅफेवर गोळीबार, 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

Latest Maharashtra News Updates : भारती विद्यापीठ बॅक गेटदरम्यान मोठी अतिक्रमण कारवाई

Video: आई शप्पथsssss असं रिपोर्टिंग तुम्ही पाहिलं नसेल! गुरुग्राममध्ये पावसाचा कहर, त्यात या पठ्ठ्याला आली लहर मग...

Thane News: सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख देण्याचा निर्धार, गणवेश बदलण्याचा निर्णय, पालिकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT