
हरियाणातील गुरुग्राममध्ये राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्या वडिलांनी हत्या केली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. आता पोलिसांनी या हत्येमागील कारण उघड केले आहे. गुरुग्राम पोलीस संदीप सिंह यांनी सांगितले की, राधिका यादव आणि तिच्या वडिलांमध्ये तिच्या टेनिस अकादमीवरून वाद सुरू होता. त्यामुळे वडिलांनी स्वतःच्या मुलीवर गोळी झाडून हत्या केली.