गुळ
गुळ esakal
फूड

साखरेपेक्षा गुळाचा वापर करून राहा हेल्दी

सकाळ डिजिटल टीम

आहारातज्ज्ञ आणि सेलिब्रिटी नेहमी सुचवत असतात की, हेल्दी (Healthy) राहायचं असेल तर साखरेपेक्षा (Suger) गुळाचा (Jaggery) वापर करा. याचं कारण काय असावं? ऊसापासूनच तयार होणाऱ्या ह्या दोन्ही पदार्थांमध्ये (Food) इतका वेगळेपणा कसा बरं ? गोडवा म्हणलं कि साखर आणि गुळ ह्या दोन गोष्टी सर्रास वापरल्या जातात. एकाच पदार्थाने बनलेल्या असणाऱ्या ह्या दोन्हींमध्ये एकच 'हेल्दी ऑप्शन' आहे का ? आणि हो तर कसा? हे समजून घेणे गरजेचे आहे. थेट खाल्लेला गूळ साखरेपेक्षा गोड असतो. पण जर आपण दोन्ही घटक पाण्यात विरघळवले तर साखर थोडी जास्त गोड होईल. गुळाचा वापर जास्त का करावा हे समजून घेणं गरजेचं आहे.

साखर

साखरेमधील स्वीटनर्स आणि क्रिस्टल हे सुक्रोजचे सर्वात सोपे उपलब्ध प्रकार आहेत. ते त्वरित आपल्या रक्तात शोषले जाते, यामधुन ऊर्जा तर मिळते परंतु यात पौष्टीक असे काहीही नसतेच . जरी ऊसापासूनच तयार झाले असले तरी, शुद्ध साखरेमध्ये कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियमचे कोणतेही घटक नाहीत. हे रक्तातील 'शुगर'च्या (sugar)अचानक वाढीसाठी देखील जबाबदार आहेत.आणि वजन वाढण्यासह इतर आजारांचे मुळ कारण आहे. दुसरीकडे गूळ, फक्त उसाच्या रसातील पाण्याचे बाष्पीभवन करून बनवला जातो. यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.गूळ रक्तातील 'शुगर' साखरेइतकी वेगाने वाढवत नाही, यामुळे आपल्या शरीराला जास्त काळ एनर्जी मिळते. इतकेच नाही तर गूळामुळे पचन क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

गूळ आणि साखर दोन्ही प्रामुख्याने सुक्रोजपासून बनतात. पण मुख्य फरक असा आहे की, साखर फक्त सुक्रोजपासून बनलेली असते आणि गुळात लोह, खनिज क्षार आणि काही फायबरचे अंश असतात. परंतु फिटनेस च्या चाहत्यांनो 'अति तेथे माती 'या उक्तीनुसार कोणत्याही गोष्टीचा प्रमाणाबाहेर वापर हा हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे गूळ कितीही हेल्दी असला तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचेही दुष्परीणाम त्याचेही आरोग्यावर होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT