Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी

उपाशी राहण्यापेक्षा काही पदार्थांच सेवन करणे टाळले पाहिजे
Weight Loss Tips
Weight Loss Tips

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोकं खूप प्रयत्न करत असतात. कोणी खूप चालतं. जीमला जाऊन व्यायाम करतं पण काही केल्या वजन कमी होत नाही. मग आहार (Food) कमी करण्यावर अनेक लोकं लक्ष देतात. त्यासाठी खूप पदार्थ खाणे टाळले जाते. अशावेळी नेमकं काय खावं काय खाऊ नये ते समजत नाही. अशावेळी अनेकांकडून कर्बोदके अर्थात कार्बचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. काहीजण तर पार विचित्रपणा करतात. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. असे केल्याने शरीराला (Body) अपाय जास्त होतो. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पण काही प्रकार नाश्त्याला तुम्ही अजिबात खाऊ नयेत. ते खाल्ल्याने नक्कीच वजन वाढू शकते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे. ( Foods To Avoid For Weight Loss)

Weight Loss Tips
Weight loss: व्यायाम न करता वजन कमी करायचयं? कसे ते वाचा
Cake
Cake

हे पदार्थ खाणे टाळाच (Do Not Consume These Foods)

१) ज्यूस कॅन - फळांच्या ज्यूसचे कॅन किंवा पॅक केलेल्या फळांच्या रसात भरपूर साखर असते. त्यामुळे नाश्त्यासाठी हा अत्यंत वाईट पर्याय आहे. या ज्यूसमध्ये प्रथिने आणि फायबर जेमतेम असते. त्यामुळे दुपारच्या जेवणाआधीच तुम्हाला खूप भूक लागते. शिवाय यात कॅलरीज भरपूर असतात.

२) बेकन किंवा सॉसेजेस -जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर प्रोसेस्ट केलेले फॅटी बेकन आणि सॉसेज सारखे प्रक्रिया केलेले मांस खाणे अजिबातच चांगले नाही. शिजवलेले सोयाबीन तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सॉसमध्ये साखर असते. त्यामुळे हे प्रक्रिया केलेले अन्न खाऊन तुमचे वजन वाढते. त्यामुळे नाश्त्याला हा प्रकार वर्ज्य करणे चांगले.

३) कुकीज आणि केक- मैदा किंवा प्रक्रिया केलेल्या पीठापासून काही कुकीज आणि केक तयार केला जातो. ज्यात कार्बोहायड्रेट ची गुणवत्ता अतिशय खराब असते. त्यात पोषणतत्व कमी प्रमाणात असतात. जास्त साखर असल्याने वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ टाळणे बरे.

Weight Loss Tips
Weight Loss : नाश्त्यामध्ये खा हे 5 पदार्थ, Belly Fat कमी करा
Bread
Bread

4) पांढरा ब्रेड - पांढरा ब्रेड प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून बनलेला असतो. त्यात कार्बोहायड्रेट्स असतात जे पटकन पचतात. त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होऊन चयापचय प्रक्रियेस अडथळा येऊ शकतो. तसेच तुम्हाला लवकर भूक लागते. त्यामुळे. पांढरा ब्रेड खाण्यापेक्षा संपूर्ण धान्य किंवा मल्टी ग्रेन ब्रेड खाणे चांगले.

५) फ्लेवर्ड योगर्ट-चांगल्या दर्जाचे घरचे दही हे कॅल्शियम, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सने युक्त असते. हे दही तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. पण जेव्हा कृत्रिम चव आणि गोड पदार्थ एकत्र केले जातात तेव्हा त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा अधिक होतो. फ्लेवर्ड योगर्टमध्ये जास्त साखर असतेय त्यामुळे अधिक कॅलरी साठतात. त्यामुळे पॅक केलेले फ्लेवर्ड दही निवडण्याऐवजी साधे दही वापरा.

Weight Loss Tips
अंजीर खा, वजन कमी करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com