फूड

डाइट, Exercise करुनही वजन कमी होत नाही? जाणून घ्या कारण

अर्चना बनगे

बऱ्याचदा आपण डायट व्यवस्थित करतो. व्यायाम ही करतो. पण वजन काही केल्या कमी होत नाही. किंवा खूप खातोय पण वजन काही वाढत नाही. नेमके काय कारण असू शकते हे लक्षात येत नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे मेटाबोलिज स्लो होणे. हे मेटाबोलिज नेमके कशाने वाढते अथवा कमी होते हे जाणून घेऊया ..

मेटाबोलिजम वाढवण्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचे काम करतात. यासाठी खाण्यात प्रोटीनचा नियमीत वापर करा. यात डाळी, छोले, राजमा बिन्स, वरण आणि कडधान्यांचा वापर केला पाहिजे. यात झीन , फायबर, आयर्न, कार्बेहाड्रड भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरीतील आॅक्सीजनचे प्रमाण चांगले ठेवण्यास मदत करतात. आॅक्सीजनचा योग्य पुरवठा जर शरीराला झाला तर मेटाबोलिज नक्कीच वाढते. ज्याचा फायदा तुम्हाला वजन वाढवायला किंवा कमी करायला मदत होते. याचबरोबर भारतीय मसाल्यांचा जसे की, काळी मिरी, लवंग, डालचिनी, आल्ले, लसून याचा आहारात नियमीत वापर केला गेला पाहिजे. याचाही फायदा होईल. नेमके कोणते पदार्थ खायचे जाणून घेऊया .

पालेभाज्या

पालेभाज्या या पचायला हलक्या असतात शिवाय यात फायबर जादा असते त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा वापर करा. त्यातल्या त्यात पालकचा वापर करा. यामध्ये फायबर, आयर्न, कॅल्शियम असतात जे मेटाबोलिज वाढवायला चांगली मदत करतात. ज्यांना कीडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी याचा जादा वापर टाळावा. तुम्ही सूप करून देखील पिऊ शकता.

फळे

खाण्यात फळांचा वापर जादा करा. यात सफरचंद आणि पेर चा वापर करा. ही दोन फळे अशी आहेत ज्यात फायबर जादा आणि कॅलरीज कमी आहेत. ही फळे नेहमी पोट भरलेले ठेवतात. मधेमधे जेव्हा खायाची इच्छा होते त्यावेळी तुम्ही फळे खाऊ शकता.यामुळे मेटाबोलिज वाढवण्यासाठी मदत होते.

ग्रीन टी, ब्लॅक काॅफी चा करा वापर

ग्रीन टी आणि ब्लॅक काॅफीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही दिवसभरात दोन ते तीन वेळा घेऊ शकता. तुम्ही प्री वर्कआउट घेऊ शखता.

पाणी :

पाण्याचे प्रमाण जर जास्त असेल तर मेटाबोलिज वाढवण्यासाठी मदत होते. यामुळे डायटमध्ये पाणी किती पिता याला खुप महत्व आहे. दिवसभरात आठ ते दहा ग्लास तसेच २० लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तहान लागायच्या आधिच थोडे थोडे पाणी प्या. यामुळे अनावश्यक भूक ही कमी होते.

तिखट खाऊ शकता

यामध्ये हिरवी मिर्ची, लाल मिर्ची, ढबू मिर्चीचा वापर करू शकता. यात कॅपॅसिकी नावाचा घटक असतो. ज्यामुळे मेटाबोलिज वाढवण्यासाठी मदत होते. तिखट खाल्याने बॉडी टेम्परेचर फास्ट होते. याचा फायदा वजन कमी करण्यास होतो. तुमच्या डायटमध्ये याचा समावेश करा आणि वजन कमी करा.

डिसक्लेमर : या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॅाक्टरांटा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parinay Fuke : त्यामुळं शिवसेनेचा बाप मीच!…भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य अन् शिंदेसेना खवळली

Stock Market Closing: सेन्सेक्स 418 अंकांनी वधारला; ऑटो, मेटल आणि रिअल्टीमध्ये मोठी वाढ

ऑगस्ट महिन्यात सणांची चाहूल लागणार, दर शुक्रवारी नव-नवीन कंटेंटचा वर्षाव होणार; वाचा चित्रपटांची यादी

OBC Reservation: मोठी बातमी! नव्या प्रभागरचनेनुसार अन् OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका होणार

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या योजनेला शेतकरी संघटनांचा विरोध; १५ ऑगस्टला 'कर्जमुक्ती'ची घोषणा

SCROLL FOR NEXT