Nagpur Food news Make bread sweet at home
Nagpur Food news Make bread sweet at home 
फूड

तुम्हाला गोड खायला आवडते? दुकानातील रसमलाई खाण्यापेक्षा घरीच तयार करा ब्रेड रसमलाई

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : रसमलाई खायला अनेकांना आवडते. तसेही गोड पदार्थ अनेकांच्या आवडीचे असतात. काही लोक फक्त गोड खाऊनच आनंदी होतात. यामुळे आपले वजन वाढेल किंवा आपल्याला मधुमेह होईल याची चिंता त्यांना नसते. गोड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे ब्रेड रसमलाई. ही रसमलाई खाल्यावर तुम्ही याची चव विसरणार नाही.

रसमलाई ही अनेकांची फेव्हरेट स्वीट डीश आहे. तुम्ही ब्रेड रसमलाईचा आस्वाद घेतला नसेल तर घरच्या घरी लवकरात लवकर ब्रेड रसमलाई कशी तयार करायची, याची पाककृती आपण आज पाहणार आहोत. या गोड पदार्थाची रेसिपी अतिशय सोपी आहे. मिठाईच्या दुकानातील रसमलाई आणण्यापेक्षा एकदा घरामध्येच ब्रेड रसमलाई नक्की ट्राय करू पाहा.

रसमलाईसाठी लागणारी सामग्री

चार ब्रेड, दोन चमचे दूध पावडर, चार कप दूध, तीन ते चार कप कन्डेंस्ड मिल्क, हिरवी वेलची, बदाम, पिस्ता व केशर.

अशी करा तयार रसमलाई

सर्वांत अगोदर ब्रेडला गोल आकारात कापा. यानंतर एका भांड्यामध्ये चार कप दूध गरम करा. दूध आटेपर्यंत गरम होऊ द्या. यानंतर दुधामध्ये दोन चमचे मिल्क पावडर मिक्स करा आणि दूध ढवळा. गॅसच्या मध्यम आचेवर दूध गरम होऊ द्या. यात तीन ते चार कप कन्डेन्स्ड मिल्क मिक्स करा. यानंतर दुधामध्ये वेलची पावडर, केशर, बदाम आणि पिस्त्या टाका. चार ते पाच मिनिटांसाठी सर्व सामग्री शिजू द्या. मिश्रण उकळून घट्ट झाल्यावर ब्रेड स्लाइस एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर तयार केलेले मलाई घालावी. तसेच वेलची पावडर, केशर, बदाम पिस्त्याचे काप, केशरने सजावट करा. गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंड करून तुम्ही ब्रेड रसमलाईचा आस्वाद घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT